नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात (City) राहणाऱ्या चौघांनी गळफास तर विवाहितेने (Married) टाॅयलेट क्लनिर पिऊन जीवन संपविले आहे. या पाचही घटनांचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून याबाबत आकस्मिक मृत्यूच्या (Death) नोंदी दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Nashik-Dindori Loksabha 2024 : नाशिकमध्ये ३१ तर दिंडोरीत १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
याबाबत अधिक माहिती अशी की, पूनम गणेश सोनवणे (वय २४, रा. अन्नपूर्णा रो हाऊस, कारगिल चौक, अंबड) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिने घरी असताना १७ मार्च रोजी टाॅयलेट क्लिनर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना उघड होताच तिला नातलगांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर २१ मार्च रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, ६ एप्रिल रोजी तिला पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना ५ मे रोजी तिचा मृत्यू झाला. अंबड पोलीसांनी तिचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. तो अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे हवालदार झोले करत आहेत.
हे देखील वाचा : Nashik Loksabha 2024 : शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार; माघार नाहीच
तर रामनरेश बरविला भैसट (वय ३१, रा. श्री गुरुजी हॉस्पिटलमागील बांधकाम साईट, मूळ रा. बाखराबागनगर, उत्तरप्रदेश) या बांधकाम मजूराने बांधकाम साईटजवळील झाडास केबल वायर बांधून (दि. ५) रोजी गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे हवालदार दिगंबर मोरे तपास करत आहेत. तसेच गीता विनायक कांबळे (वय ७०, रा. ऑलिव्हिया, रॉयल कॉलनी, पखाल रोड) या वृद्धेने (दि. ५) बेडरुमध्ये गळफास घेतला. यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकणी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.
हे देखील वाचा : Dindori Loksabha 2024 : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणांची दिंडोरी लोकसभेतून माघार
तसेच अमित एकनाथ बोरसे (वय २०, रा. सुमन अपार्टमेंट, चांगलचुंगल हॉटेलजवळ, पाथर्डी फाटा) याने रविवारी (दि. ५) रोजी दुपारी दीड वाजेपूर्वी घरातील हॉलमध्ये गळफास घेतला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळले नसून पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत. तर, सिद्धेश्वर देविदास चव्हाण (वय ४३, रा. न्हावी गल्ली, काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, पंचवटी) या खाजगी इलेक्ट्रिशनने (दि.५) रोजी सकाळी घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी पुढील तपास पंचवटीचे हवालदार योगेश वाडेकर करत आहेत.
हे देखील वाचा : अखेर माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांची माघार