Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यादेवळ्यात ५ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी करोनाबाधीत

देवळ्यात ५ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी करोनाबाधीत

वैभव पवार | खामखेडा

शालेय शिक्षण विभागाकडून ९ ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यापार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तत्पूर्वी गेल्या तीन दिवसांत देवळा तालुक्यातील ६९८ शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची देवळा आरोग्य विभागाकडून मोफत करोना चाचणी करण्यात आली.

- Advertisement -

यामध्ये धक्कादायक म्हणजे पाच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. असे असले तरी शाळा सुरू होण्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांनी दिली आहे.

देवळा, खामखेडा, दहिवड आणि मेशी अशा चार आरोग्य केंद्रावर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली असून यामध्ये रॅपिड अँटिजेंन तसेच आरटी पीसीआर पद्धतीचा कोरोना चाचणीसाठी अवलंब करण्यात आला.

करोना संसर्गामुळे शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आले होते. आता हळूहळू सर्वच अनलॉक होत आहे. देवालये उघडल्यावर आता शासनाकडून माध्यमिकचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार २३ नोव्हेंबरपासून राज्यातील ९ ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहे. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने १७ नोव्हेंबर रोजी यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे शिक्षकांची मोफत कोविड चाचणी करण्यात आली.

देवळा तालुक्यातील ६९८ शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाडे देण्यात आली होती यासाठी १९,२०.२१ नोव्हेंबर या तीन दिवस कोरोना चाचणी करण्यासाठी आयोजन करण्यात आले होते यामध्ये रॅपिड अँटिजेंन चाचणीत ३ तर आरटीपीसीआर चाचणी मध्ये २ असे एकूण पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले असून यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

ही घ्यावी लागणार खबरदारी

शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहेत. त्याअनुषंगाने सर्व वर्ग खुले करून स्वच्छ, करावे लागणार आहेत. या काळात पडझड झालेल्या शाळांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. शाळांचे सॅनिटायझींग करणे, स्वच्छता गृहांमध्ये घाण साचलेली आहे. त्याकडे लक्ष देऊन त्यांची योग्य स्वच्छता करणे, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी साबण, हॅन्डवॉशची पुरेशा प्रमाणात सोय करून देणे, वर्ग घेताना सुरक्षित अंतर राखणे, कोविड बाबत जनजागृतीही करणे पालकांची समजूत काढण्यासह विविध आव्हान शिक्षण विभागावर आहेत.

करोनाच्या अनुषंगाने शाळा सुरू होण्यापूर्वी खबरदारी म्हणून देवळा तालुक्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोफत कोविड तपासणी करण्यात आली असून यामध्ये पाच जण करोनाबाधीत आढळून आले आहेत संबंधित बाधीत व्यक्तींना पूर्णपणे बरे होईपर्यंत शाळेत प्रवेश दिला जाणार नसल्याने शाळा सुरू होण्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. शाळा स्वच्छतेसह विविध उपाययोजना शासनाकडून सुचविण्यात आल्या आहेत. तसेच मुलांना शाळेत पाठविण्यास पालकांची लेखी संमती आवश्यक आहे असून शाळेत पाठविणे बाबत सक्ती केली जाऊ नये. शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.

सतीश बच्छाव , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देवळा

गेल्या तीन दिवसांत देवळा तालुक्यातील ६९८ शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यामध्ये पाच अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नसल्याने घरीच विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे.

डॉ. सुभाष मांडगे तालुका आरोग्यधिकारी देवळा

- Advertisment -

ताज्या बातम्या