Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजट्रॅक्टर-दुचाकींसह पाच चोरटे जेरबंद

ट्रॅक्टर-दुचाकींसह पाच चोरटे जेरबंद

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरातून दुचाकी तसेच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथून ट्रॅक्टर चोरणार्‍या ५ जणांच्या टोळीचा छडा लावण्यास पवारवाडी पोलिसांना यश आले. ३० दुचाकी व एक ट्रॅक्टर असा सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत १४ गुन्हे उघडकीस आणले आहे. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पवारवाडी भागातून शहजाद सैय्यद एकबाल (रा. सलामताबाद) व शेख युसूफ शेख अय्युब (रा. गुलशेरनगर) या दोघांनी दुचाकी चोरी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना मिळाली होती. हे दोघे सराईत असल्याने जिल्हा पोलीसप्रमुख बाळासाहेब पाटील, अ.पो. अधिक्षक तेगवीरसिंह संधू व उपअधिक्षक सिध्दार्थ बारबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. खताळ यांच्या नेतृत्वाखाली सपोनि किरण पाटील, हवा. राकेश उबाळे, संतोष सांगळे, निलेश निकम, जाकीर पठाण, नवनाथ शेलार, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, सचिन राठोड यांच्या पथकाने या दोघांचा शोध घेण्यास प्रारंभ केला होता.

सवंदगाव फाटा परिसरात हे दुचाकीसह येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे सापळा लावत हे दोघे येताच त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. शहजाद व शेख युसूफ याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी शेख नजीम अब्दुल हमीद (रा. रौनकाबाद) व प्रल्हाद प्रमोद वाघ तसेच देविदास नानाजी वाघ (दोघे रा. सवंदगाव) यांच्यासह शहरातील किल्ला, छावणी, पवारवाडी व कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तसेच जिल्ह्यातील नांदगाव, निफाड, पिंपळगाव, चांदवड, कळवण, पंचवटी व नाशिक येथून ३० दुचाकी तसेच धरणगाव जि. जळगाव येथून ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी तपासाची सुत्रे वेगाने हलवित या दुचाकींसह ट्रॅक्टर असा सुमारे २१ लाखाचा मुद्देमाल या चोरट्यांकडून जप्त केला.

दुचाकी व ट्रॅक्टर चोरीप्रकरणी दाखल असलेले १४ गुन्हे उघडकीस आले असून संबंधित पोलीस ठाण्यांशी या संदर्भात संपर्क साधण्यात आला आहे. हे पाचही चोरटे सराईत असल्याने चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

Crime News : महिलेवर चाकूने वार करुन अत्याचाराचा प्रयत्न

0
गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi महिलेवर चाकूने वार करुन अत्याचाराचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा नेवासा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली...