कोतूळ (वार्ताहर) –
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रशासन कडक अंमलबजावणी करत आहेत. ग्रामस्थांनी कठोर
कारवाई करण्यास भाग पाडू नका, प्रत्येकाने सामाजिक अंतर राखून शासनाने घालून दिलेले नियम पाळा असे, आवाहन कोतूळ ग्रामपंचायतीने केले.
करोना पुन्हा डोके वर काढू लागल्याने कोतुळ ग्रामपंचायतीने बुधवारी ग्रामस्थ व व्यापारी यांची बैठक घेऊन नागरिकांना सूचना दिल्या.
यावेळी सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख, राजेंद्र पाटील देशमुख, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, ग्रामविकास अधिकारी सुभाष जाधव, कामगार तलाठी संतोष जाधव, पोलीस पाटील सतीश देशमुख, शिवाजी देशमुख, व्यापारी रमेश नेवासकर, सुनील शहा, सनी घाटकर, अनिल देशमुख, गणेश घाटकर, प्रमोद गोडे, अक्षय कोते, परवेझ शेख, विजय नेवासकर आदी सह ग्रामस्थ, व्यापारी उपस्थित होते.
प्रत्येकाने मास्क वापरा सॅनियायझर चा वापर करा, वारंवार हात धुणे सामाजिक अंतर राखणे असे नियम पाळले तर करोनाला आपण रोखु शकतो. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून शासनाचे नियम पाळले पाहिजे. विना मास्क फिरणार्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे ग्रामविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी यावेळी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारचा आठवडे बाजार बंद करण्यात आला.




