Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभाजप आमदारच्या भावाला अपघाताचा बनाव रचून मारण्याचा कट; बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

भाजप आमदारच्या भावाला अपघाताचा बनाव रचून मारण्याचा कट; बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

अमरावती | Amaravati
राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर खुनाचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चू कडू यांनी कट रचून भाजप आमदाराच्या भावाला मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांकडून चांदूर बाजार येथे बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. परिणामी बच्चू कडू यांच्यावर खुनाचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी मंत्री बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर कट रचून ठार मारण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला असून बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

Anjali Damania: रुपाली चाकणकरांचे खरातसोबत ‘इतक्या’ वेळा संभाषण, ‘या’ नेत्यांचेही कॉल डिटेल्स; अंजली दमानियांनी काढला CDR

रस्ते अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीवरून माजी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चू कडू, गोलू माहुरे आणि आणखी एका व्यक्तीवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. आमदार प्रवीण तायडे यांनी त्यांचे चुलतभाऊ अभिजीत तायडे यांच्यावर रस्ते अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप केलाय. तक्रार आणि पेन ड्राइव्हच्या प्राथमिक तपासानंतर चांदूर बाजार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर चांदूर बाजारसह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मोबाईल रेकॉर्डिंगचा पुरावा
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे एक मोबाईल रेकॉर्डिंग. अभिजित तायडे यांनी पोलिसांना या कथित कटाबाबतच्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग एका पेनड्राईव्हमध्ये देऊन सुपूर्द केली आहे. या रेकॉर्डिंगमध्ये खुनाचा कट कसा अमलात आणायचा, याबाबतचे संभाषण असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी हा पेनड्राईव्ह जप्त केला असून पुढील तपासासाठी तो फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आला आहे.

चांदूर बाजार पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बच्चू कडू आणि गोलू माहोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ५५, ५८, आणि ६१ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू आणि तायडे कुटुंब यांच्यात मोठा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आमदार प्रवीण तायडे यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा उल्लेखही या तक्रारीत करण्यात आला आहे. राजकीय वैमनस्यातून हा कट रचला गेला की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना ‘खो’

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदा जनगणनेच्या कामासाठी बहुतांश जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना जबाबदारी दिल्याने यंदा होणारी जि. प. कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याबाबत...