Friday, May 3, 2024
HomeUncategorized'लिखाणाची गती मंदावल्या'ने अर्धा तास वाढीव वेळ!

‘लिखाणाची गती मंदावल्या’ने अर्धा तास वाढीव वेळ!

औरंगाबाद – aurangabad

बोर्डाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा (examination) शुक्रवारपासून (४ मार्च) सुरू हाेत आहे. पहिला पेपर इंग्रजीचा (English) असेल. (corona) कोरोनामुळे दोन वर्षे (Schools-colleges) शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांची लिखाणाची गती मंदावली आहे. त्यामुळे सर्वसाधारण मुलांना अर्धा तास, तर दिव्यांग मुलांना वाढीव वेळ दिला जाणार आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव आर.पी. पाटील यांनी दिली.

- Advertisement -

परीक्षेसाठी औरंगाबाद जिल्ह्यासाठी सात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्यात प्राथमिक, माध्यमिक, निरंतर, प्रौढ, प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि तहसीलदारांच्या अंतर्गत एक पथक असेल. औरंगाबाद विभागातून १ लाख ६९ हजार २८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यंदा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा असल्याने केंद्रांची संख्या चौपट वाढली आहे.

विद्यार्थ्यांनी एक तास आधी केंद्रावर यावे

पेपरची वेळ सकाळी १०:३० ते दुपारी २ अशी आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी एक तास आधी यावे. तीन तासांच्या पेपरसाठी अर्धा तास अधिक वेळ देण्यात येणार आहे. ४०/७० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिकांची तरतूद करण्यात आली आहे. त्यांना प्रत्येक तासाला वीस मिनिटे जास्त वेळ मिळेल. सर्वांनी मास्क लावून यावे.

परीक्षा केंद्रांना सूचना

एका बाकावर एक विद्यार्थी बसेल. वीजपुरवठा खंडित करू नये, यासाठी आपापल्या परिसरातील महावितरणच्या कार्यालयाला पत्र द्यावे, सर्व केंद्रांना सॅनिटायझरसाठी निधी द्यावा, केंद्रांना पोलीस बंदोबस्त द्यावा, उपद्रवी केंद्रांना बंदोबस्त करावा, परीक्षा केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात झेरॉक्स यंत्रणा बंद करावी, केंद्रात ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश देऊ नये, मुला-मुलींना केंद्रात प्रवेश देताना स्वतंत्र तपासणी करावी, मुलींसाठी महिलांचे स्वतंत्र पथक नियुक्त करावे, अशा सूचना बोर्डाने दिल्या आहेत.

मुलांसाठी दोन समुपदेशकांची नियुक्ती

तणावमुक्त परीक्षा देता यावी, यासाठी मंडळाच्या वतीने मोफत समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. औरंगाबादसाठी बाळासाहेब चोपडे (९२८४८४७५८२) आणि शशिमोहन सिरसाट (९४२२७१५५४६) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील एकूण विद्यार्थी

औरंगाबाद ५८,३४७

बीड ३८,१४३

जालना ३१,३७६

परभणी २४,४७१

हिंगाेली १३,४७२

- Advertisment -

ताज्या बातम्या