Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रसाखर कामगारांच्या मागण्यांवर विचारासाठी त्रिपक्षीय समिती

साखर कामगारांच्या मागण्यांवर विचारासाठी त्रिपक्षीय समिती

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी अशी त्रिपक्षीय समिती गठीत केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी दि.8 जुलै 2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. सदर समितीने आपला अहवाल शासनास सादर केल्यानंतर समितीने केलेल्या कराराची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दि.12 ऑक्टोबर 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये सर्व संबंधितांना देण्यात आल्या होत्या. सदरहू त्रिपक्षीय समितीने केलेल्या करारनाम्याच्या अंमलबजावणीचा कालावधी 31 मार्च 2019 संपुष्टात आलेला आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्याबाबत साखर कारखाना मालक प्रतिनिधी , साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी यांची त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याबाबत कामगार संघटनानी दिलेला मागणी प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यातच राज्यातील कामगार संघटनानी 30 नोव्हेंबर पासून संपावर जाण्याची घोषणा केली होती.त्या पार्श्वभूमीवर खा. शरद पवार यांचे पुढाकाराने राज्य शासनाने तातडीने त्रिपक्षीय समिती गठीत केली आहे.

साखर कारखाने मालक प्रतिनिधी…

1) श्री.जयप्रकाश साळुखे-दांडेगांवकर , पुर्णा सहकारी साखर कारखाना लि . , पो , बसमतनगर , जि , हिंगोली (अध्यक्ष)

2)श्री.श्रीराम सहादू शेटे , कादवा सहकारी साखर कारखाना लि . , मातेरेवाडी , ता . दिंडोरी , जि . नाशिक (सदस्य)

3) श्री.आबासाहेब पाटील , रेणा सहकारी साखर कारखाना लि . , दिलीप नगर निवाडा , पो . सिंघगांव , ता . रेणापूर , जि . लातूर (सदस्य)

4) श्री . विजयसिंह मोहिते-पाटील ( मा . लोकसभा सदस्य ) , स . म . शंकरराव मोहिते पाटील स . सा . का . लि . , शंकरनगर अकलूज , मु . शंकरनगर , पो . यशवंतनगर , ता . माळशिरस , जि . सोलापूर (सदस्य)

5) श्री . हर्षवर्धन पाटील , कर्मवीर शंकररावजी पाटील स . सा . का . लि . , महात्मा फुले नगर , पो . बिजवडी , ता . इंदापूर , जि . पुणे (सदस्य)

6) मा.आ . श्री . प्रकाश कल्लाप्पाण्णा आवाडे , जवाहर शेतकरी स . सा , का . लि . , श्री . कल्लाप्पाण्णा आवाडेनगर , हुपरी – यळगूड , ता . हातकणंगले , जि . कोल्हापूर (सदस्य)

7) श्री.चंद्रदीप नरके , कुंभी कासारी स . सा . का . लि . , कुडीत्रे , ता . करवीर , जि . कोल्हापूर (सदस्य)

8) श्री . राजेंद्र नागवडे , स . म . शिवाजीराव ना . नागवडे स . सा . का . लि . , मु . पो . श्रीगोंदा , जि . अहमदनगर (सदस्य)

9) माजी आ.श्री.भानुदास मुरकुटे , अशोक स . सा . का . लि . , अशोकनगर , ता . श्रीरामपुर , जि.अहमदनगर (सदस्य)

10) माजी. आ . श्री . के . पी . पाटील , दुधगंगा वेदगंगा स . सा . का . लि . , बिद्री , पो . बिद्री , ता.कागल , जि . कोल्हापूर (सदस्य)

11) श्री . संजय खताळ , व्यवस्थापकीय संचालक , साखर संघ , मर्या, मुंबई (सदस्य)

12) श्री.बी.बी.ठोंबरे , चेअरमन , नॅशनल शुगर अण्ड अलाईड इंडस्ट्रिज लि . , साईनगर रांजणी , ता . कळंब , जि . उस्मानाबाद (सदस्य)

13) श्री . प्रल्हाद गोविंदराव साळुखे पाटील , चेअरमन , न्यु फलटण शुगर फॅक्टरी , मु . पो . सुरवडी , ता . फलटण , जि . सातारा (सदस्य)

साखर कामगार संघटना प्रतिनिधी…

1)आ.श्री.अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप , अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन (सदस्य)

2) श्री.तात्यासाहेब काळे , अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ(सदस्य)

3) श्री.शंकरराव भोसले , सरचिटणीस , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (सदस्य)

4) श्री.अविनाश आपटे,कार्याध्यक्ष , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (सदस्य)

5) राऊसाहेब पाटील , कार्याध्यक्ष , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (सदस्य)

6) श्री.रावसाहेब भोसले , कोषाध्यक्ष , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (सदस्य)

7) श्री.अशोक बिराजदार , प्रतिनिधी , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (सदस्य)

8) श्री.सुरेश मोहिते , प्रतिनिधी , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (सदस्य)

9) श्री.आनंदराव वायकर , सरचिटणीस , महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ , श्रमिक , टिळक रोड , अहमदनगर(सदस्य)

10) श्री.सुभाष काकुस्ते , सरचिटणीस , महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ , श्रमिक , टिळक रोड , अहमदनगर(सदस्य)

11) श्री.अविनाश गोविंदरावजी आदिक ,अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर फेडरेशन,इंटक,श्रीमरापूर (सदस्य)

12) श्री. नितीन बबनराव पवार, सरचिटणीस-महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर फेडरेशन,इंटक,श्रीरामपूर (सदस्य)

13) श्री.पोपटराव मिटकरी , मालेगांव तालुका , राष्ट्रीय शुगर वर्कर्स युनियन , रावळगाव , ता . मालेगांव(सदस्य)

14) श्री .योगेश नामदेव हंबीर , श्रीनाथ मस्कोबा साखर कारखाना , मु . पो . पैठण, ता . दौंड (सदस्य)

15) श्री . डी . डी . वाघचौरे (सदस्य)

निमंत्रित सदस्य…

1) अड.भूषण महाडिक , ३०१ , श्रीजी चेंबर्स , ६० जन्मभूमी मार्ग , ३ रा मजला , फोर्ट , मुंबई (सदस्य)

शासन प्रतिनिधी…

)साखर आयुक्त,महाराष्ट्र राज्य

2) कामगार आयुक्त,महाराष्ट्र राज्य

सदस्य सचिव…

1) श्री.रविराज इळवे , कल्याण आयुक्त,कामगार कल्याण मंडळ मुंबई

सदरहू समिती महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कामगारांच्या मागण्यांवर विचार करून समिती स्थापन झाल्याच्या दिनांकापासून ६ महिन्याच्या कालावधीत शिफारशींसह शासनास अहवाल सादर करेल.

संपाचा इशारा देताच समिती गठीत….

राज्यातील साखर उद्योगातील कामगारांच्या कराराची मुदत 31 मार्च 2019 रोजी संपली आहे. 01 एप्रिल पासून राज्यातील साखर उदयोगातील कामगारांचे वेतनवाढ व सेवा शर्ती ठरविण्यासाठी तातडीने त्रिपक्ष समिती गठीत करून कामगारांना नवीन 40 टक्के वेतनवाढीचा लाभ मिळावा या मागणी विविध कामगार संघटनांनी केलेली आहे.कामगार संघटनांनी एप्रिल 2019 मध्येच साखर कामगारांच्या मागण्याची नोटीस राज्य शासनाला दिलेली आहे. त्याला 17 महिन्याचा कालावधी उलटला तरी ही शासन पातळीवर या मागण्यांबाबद कोणताच निर्णय होत नाही हे ओळखून राज्यातील साखर कामगार संघटनांनी गळीत हंगाम सुरू असतानाच 30 नोव्हेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता,तशी नोटीस ही शासनाला देण्यात आली होती.त्यामुळेच शासनाने तातडीने त्रिपक्षीय समिती गठीत केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या