Thursday, May 2, 2024
HomeनाशिकLoksabha Election 2024 : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडाच्या तयारीत?

Loksabha Election 2024 : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडाच्या तयारीत?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आदिवासी नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) हे बंडाच्या तयारीत असून त्यांचे समर्थक व आदिवासी संघटनांनी शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपात (BJP) एकच खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

विद्यमान राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांना पुन्हा भाजपकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने हरिश्चंद्र चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांमध्ये असंतोष उफाळला आहे. विविध आदिवासी संघटना चव्हाण यांनी उमेदवारी करावी यासाठी पुढे आल्या आहेत. चव्हाण हे भाजपचे निष्ठावंत खासदार (MP) म्हणून ओळखले जातात.

Rahul Gandhi : मोदी सरकारने २२ उद्योगपतींचे…; राहुल गांधींचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे उद्या बुधवारी (दि.१३) रोजी नाशिक (Nashik) जिल्ह्यात येत असून मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात शरद पवार भाजपला खिंडार पाडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण ‘आर या पार’च्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, भाजपचे अनेक पदाधिकारी सर्व घडामोडींवर लक्ष्य ठेऊन आहेत. तसेच यापूर्वी चव्हाण हे पवार यांचेच प्रतिनिधी होते.नंतर ते भाजपकडून खासदार झाले. त्यानंतर आता पुन्हा पवार गटात गेल्यास एक वर्तुळ पूर्ण होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या