Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यावकील गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी

वकील गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारा | वृत्तसंस्था Satara

सातारा (Satara) आणि कोल्हापूर (Kolhapur) येथील छत्रपतींच्या वंशजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी न्यायालयाने वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना चार दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. १८ एप्रिलपर्यंत त्यांना पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत….

- Advertisement -

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) एका वृत्तवाहिनीशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे वंशज असलेल्या कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती (Kolhapur MP Sambhajiraje Chhatrapati) व साताराचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य त्यांनी केल्यामुळे त्यांच्या विरोधात सातारा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी सातारा पोलिसांनी (Satara Police) सदावर्ते यांचा काल ताबा मिळवत त्यांना साताऱ्याला नेले होते. आज त्यांना सातारा न्यायालयात (Satara District Court) हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत चार दिवसांची पोलीस कोठडी (Four Days Police Custody) सुनावली. सदावर्ते यांना जेल की बेल अशी चर्चा सबंध महाराष्ट्रात सुरु असतानाच त्यांना जेल मिळाल्याने मोठी चर्चा राज्यात होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या