Thursday, July 2, 2026
HomeUncategorizedजळगावात आढळले आणखी चार करोना पॉझिटिव्ह रुग्ण

जळगावात आढळले आणखी चार करोना पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव  – 

जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या २२ कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल सोमवारी प्राप्त झाले. यापैकी १८ व्यक्तीचे  अहवाल निगेटिव्ह आले असून चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

- Advertisement -

पॉझिटिव्ह आढळलेले चारही रुग्ण जळगाव शहरातील आहेत. यात जळगावातील मारुतीपेठमधील ४९ वर्षीय महिला, ओंकारनगरातील ७९ वर्षीय पुरुष, प्रतापनगरातील ३२ वर्षीय महिला, तर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाील २३ वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आतापर्यंत १७६

जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगावातील एक ५० वर्षीय पुरुष व एक ५५ वर्षीय महिलेचा तर चोपडा येथील एका ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिह रुग्णांची आतापर्यंत १७६ संख्या झाली असून त्यापैकी २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सक्तीने धार्मिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न; सरकारवाडा पोलीस...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik उदरनिर्वाहासाठी परराज्यातून नाशिकमध्ये (Nashik) आलेल्या एका एकाकी महिलेला जाळ्यात ओढून तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतल्याची घटना समोर आली आहे. लग्नाचे खोटे...