Wednesday, February 4, 2026
HomeनगरSuicide News : एकाच दिवसात चार आत्महत्या; पाथर्डी तालुक्यात खळबळ

Suicide News : एकाच दिवसात चार आत्महत्या; पाथर्डी तालुक्यात खळबळ

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यात बुधवारी (दि.5) आत्महत्यांच्या सलग घटनांनी खळबळ उडाली आहे. तालुक्यातील घाटशिरस येथे नवविवाहित दांपत्याने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले, तर पाथर्डी शहरातील इंदिरानगर भागात एका 28 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तसेच साकेगाव येथील 30 वर्षीय युवकाने काही दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. बुधवारी उपचारादरम्यान त्याचीही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या चौघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

घाटशिरस येथील भाउसाहेब शिवराम माळी (वय 25) आणि त्यांची पत्नी प्रियंका भाउसाहेब माळी (वय 19) या नवविवाहित दांपत्याने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांचा विवाह केवळ वर्षभरापूर्वी झाला होता. बुधवारी सकाळी गावच्या शिवारात दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे हे करीत आहेत. दरम्यान, पाथर्डी शहरातील इंदिरानगर भागात संजना सुनिल खुडे (वय 28, रा. नाथनगर) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संजनाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल वैभव साळवे हे करीत आहेत.

YouTube video player

तसेच साकेगाव येथील अंबादास पाराजी वाघ (वय 30) या युवकाने दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 1.10 वाजता विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे करीत आहेत.

ताज्या बातम्या

शरद

Sharad Pawar: “त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे?” विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांनी...

0
बारामती | Baramatiराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर वेगवेगळ दावे करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाबाबत दिवंगत अजितदादा पवार...