सिन्नर | Sinnar
सिन्नर-घोटी महामार्गावर (Sinnar-Ghoti Highway) तालुक्यातील सोनांबे (Sonambe) शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा (Fox) ठार झाल्याची घटना आज (दि.२५) सकाळच्या सुमारास घडली.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाने उचांकी गाठल्याने याचा फटका वन्य प्राण्यांनाही बसत आहे. जंगल परिसरातील जलस्रोत आटल्याने वन्य प्राणी (Wild Animals) अन्न आणि पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहे. सिन्नर तालुक्यात (Sinnar Taluka) नागरी वस्त्यांवर बिबट्यांचा वावर तसेच नागरिकांवर हल्ले या घटना नित्याच्या झाल्या आहेत. त्यात पाण्यासाठी हिंडणाऱ्या काही प्राण देखील गमावावे लागत आहे. येथील वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक आई भवानी डोंगर परिसरात वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य करीत आहेत.
बरेच स्वयंसेवक वेळ मिळेल तसे सकाळच्या सुमारास येथे श्रमदान करतात. नेहमीप्रमाणे ते आज सकाळच्या सुमारास स्वयंसेवक सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगराजवळ पोहोचत असताना त्यांना सिन्नर-घोटी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेला कोल्हा आढळून आला. त्यांनी पशुवैद्यकास तपासणीसाठी बोलावले. मात्र, कोल्ह्याचा जागीच मृत्यू झालेला होता. वनविभागाच्या सेवकांनी घटनास्थळी येत मृत कोल्ह्यास तेथून मोहदरी येथील वन उद्यानात (Forest Park) हलवले आहे.