नाशिक । प्रतिनिधी Nashik
बोधलेनगर येथे पोलीस असल्याची बतावणी करीत संशयितांनी 75 वर्षीय वृद्धाची अंगठी व चैन असा सोन्याचे ऐवज हातचलाखीने लंपास केला.
- Advertisement -
मधुकर ओंकार माळी (74, रा. बोधलेनगर) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि.3) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्प्रींग व्हॅलीच्या कॉर्नरवरून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करीत तपासणी सुरू असल्याचे सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
त्यावेळी एका संशयितांने त्यांच्या हाताच्या बोटातील अंगठी, गळ्यातील चैन व मोबाईल असा 60 हजारांचा ऐवज हातरुमालात बांधून देताना हातचलाखीने ऐवज लंपास केला आणि पसार झाले. या प्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.