Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारमॉडेल स्कुलला मंजुरीचे आमिष : संस्थाचालकाची ६५ लाखांत फसवणूक

मॉडेल स्कुलला मंजुरीचे आमिष : संस्थाचालकाची ६५ लाखांत फसवणूक

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

दिल्लीहून मॉडेल स्कुलची (Model School) मंजुरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून (Dhule) धुळे येथील दोघे व नाशिक येथील एकाने कुढावद ता.शहादा येथील संस्थाचालकाची ६५ लाखात फसवणूक केल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबत पोलीस (Police) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१३ ते २०१९ दरम्यान धुळे येथील श्रीराम कॉलनीतील रहिवासी बन्सीलाल सखाराम सोनवणे, अमोल बन्सीलाल सोनवणे यांनी दीपक तुकाराम देवरे (रा.महादेव सोसायटी, त्रिमुर्ती चौक, नाशिक) हा दिल्ली येथे मानव विकास मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी आहे असे कुढावद ता.शहादा येथील अशोक हिरालाल पाटील यांना सांगून तुम्हाला जय देवमोगरा माता बहुउद्देशिय संस्था कुढावद या संस्थेच्या माध्यमातून मॉडेल स्कुल मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवले व तिघांनी संगनमत करुन ६५ लाखात फसवणूक केली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी तिघांकडून पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी रक्कम न देता पाटील यांना शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पाटील यांनी पोलीसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बिर्‍हाडे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या