Sunday, May 5, 2024
Homeनंदुरबारदलेलपूर शिवारात बिबटयाचा मुक्तसंचार

दलेलपूर शिवारात बिबटयाचा मुक्तसंचार

तळोदा | श.प्र.- TALODA

येथील माजी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या तालुक्यातील दलेलपूर शिवारात असलेल्या शेतात बिबट्याच्या मुक्त संचार असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

तालुक्यातील दलेलपूर शिवारात असलेल्या माजी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या शेतात तयार केलेल्या विश्रामगृहाजवळ शुक्रवारी बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. फटाके फोडूनही बिबट्या तेथून पळ काढत नसल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन विभागाने पिंजरा लावून तत्काळ या बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी केली आहे. दरम्यान, शनिवारी देखील तेथेच बिबट्या आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तळोदा तालुका सातपुडा पर्वताच्यापायथ्याशी आहे. त्यामुळे वारंवार हिंसक प्राण्यांचा वावर असतो. दलेलपूर शिवारातील माजी नगराध्यक्ष परदेशी यांच्या शेतात बिबट्या हा भर दिवसा दुपारी तीन वाजेचा सुमारास शेतात तयार केलेल्या विश्रामगृहाच्या आवारात येऊन बसल्याचे शेतमजुरांनी पाहिले.

त्यामुळे त्यांची चांगलीच त्रेधा उडाली. त्यांनी जवळच असलेल्या गोदामात कोंडून घेतले. शनिवारी सकाळी पुन्हा याच विश्रामगृहावर बिबट्या डरकाळ्या फोडत बसला होता. तत्काळ मजुरांनी विश्रामगृहात धाव घेतली.

यावेळी परदेशींचे लहान बंधू विजय परदेशी शेतात फेरफटका मारण्यास गेले होते. त्यांनी बिबट्याचे चित्रीकरण केले. त्याबाबत त्यांनी अजय परदेशींना कळवले. याबाबत वन विभागाला अवगत करून बिबट्यास पिंजरा लावून जेरबंद करण्याची करण्याची मागणी केली.

दरम्यान शेतमजूर व रखवालदाराने बिबट्यास हाकलण्यासाठी फटाके फोडले. मात्र तरी त्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. विजय परदेशींनीही विविध आवाज करून बघितले. मात्र बिबट्या बसूनच होता. काही वेळानंतर तो शेजारी शेतांमध्ये पळाला. परिसरातील शेतकर्‍यांना याबाबत सांगून त्यांना सावध केल्याचे त्यांनी सांगितले.

वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सदर शेतास भेट देण्यात आली असून बिबट्याला पकडण्यासाठी बाहेरून मोठा पिंजरा मागविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या