Sunday, May 5, 2024
Homeनंदुरबारनंदुरबारात ‘महाज्योती’तर्फे ‘तृतीय रत्न’ नाटकाचा नि:शुल्क प्रयोग

नंदुरबारात ‘महाज्योती’तर्फे ‘तृतीय रत्न’ नाटकाचा नि:शुल्क प्रयोग

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात (Chhatrapati Shivaji Maharaj Natyagriha) उद्या दि.८ जून २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘तृतीय रत्न’ (Tritiya Ratna) या नाट्यप्रयोगाचे निःशुल्क आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) (Mahajyoti) व्यवस्थापकीय संचालकांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

- Advertisement -

या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘महाज्योती’चे (Mahajyoti) अध्यक्ष विजय वडेट्टीवार,

संचालक डॉ.बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) लिखित ‘तृतीय रत्न’ (Tritiya Ratna) नाटकाचा प्रयोग करण्याचे योजिले आहे. अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून क्रिएटिव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत.

एकुण ३० कलाकार व सहकार्‍यांचा या नाटकात सहभाग असणार आहे. याआधी विविध जिल्ह्यात ३० प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उत्फूोगर्त असा प्रबोधनात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

सदर नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या