Friday, May 3, 2024
Homeनाशिकग्रामपंचायतकडून विद्यार्थ्यांना मोफत प्रवास

ग्रामपंचायतकडून विद्यार्थ्यांना मोफत प्रवास

विंचूरदळवी । वार्ताहर Vin̄chūrdaḷavī

ग्रामपंचायतनेे (grampanchayat) जिल्हा परिषद (zilha parishad) शाळेतील (shcool) विद्यार्थ्यांना (students) 15 व्या वित्त आयोगातून (Finance Commission) मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करुन देत नविन वर्षाची अनोखी भेट दिली आहे. ‘आमचा गाव, आमचा विकास’ उपक्रमांतर्गत मानव विकास निर्देशांक विकसित करण्यास आवश्यक कामांना प्राधान्य देण्याबाबत 4 नोव्हेंबर 2015 रोजी ग्रामविकास विभागाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.

- Advertisement -

त्याअंतर्गत विंचूरदळवी ग्रामपंचायतने कार्यक्षेत्रातील 50 मुलांना शाळेत पोहचवण्याची जबाबदारी घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत येण्यासाठी या विद्यार्थ्यांना दररोज 2 ते 3 किमी पायपीट करावी लागत आहे. आर्थिक स्थिती उत्तम असणार्‍या पालकांची मुले खासगी बसने इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये जात आहेत.

मात्र, प्राथमिक शाळेत (elementary school) पायी येणार्‍या मुलांची होणारी दमछाक पाहता ग्रामपंचायतीने सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा तयार करताना प्राथमिक शाळेतील मुलांना बस प्रवासाकरिता 1 लाख 25 हजारांची तरतूद केली होती. कोविडमुळे (corona) शाळा बंद झाल्याने या उपक्रमास सुरुवात करण्यात आली नव्हती. नुकत्याच शाळा सुरु झाल्याने आज ( दि.1) पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दोन्ही बाजुचा बस प्रवास ग्रामपंचायतीच्या वतीने बस मालकास 100% भाडे देऊन विद्यार्थ्यांना मोफत पुरवण्यात येणार आहे.

त्याचा प्रांभ उपसरपंच अरुण दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच सुशिला भोर, ग्रामपंचायत सदस्य परसराम दळवी, बाजीराव भोर, रमाकांत बर्वे, विलास पवार, जिजा शेळके, सविता चंद्रे, वैशाली शेळके, निर्मला दळवी, ताराबाई भोर, ग्रामविकास अधिकारी संजय गिरी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र पवार, सतीश भोर, संजय भोर, मुख्याध्यापिका मंगला काळे, प्रविण शिंपी, लक्ष्मण जाधव उपस्थित होते.

ग्रामपंचायतचा 100 टक्के खर्च जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढावी व गळती थांबवी तसेच शालेय विद्यार्थ्यांची दमछाक थांबावी म्हणून ग्रामपंचायतीने हा उपक्रम सुरु केलेला आहे. या शैक्षणिक वर्षात ग्रामपंचायत 100% खर्च करणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात ग्रामपंचायत 50% व पालक 50% अशा संयुक्त सहकार्याने ही योजना यापुढे कायम सुरु ठेवण्यात येईल.

सुशिला भोर, सरपंच

- Advertisment -

ताज्या बातम्या