Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजGanesh Festival 2024 : नाशकात देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी

Ganesh Festival 2024 : नाशकात देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

अनंत चतुर्दशीला अवघे दोन दिवस बाकी असल्याने आपल्या लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सादर केलेले देखावे बघण्यासाठी गणेश भक्तांनी आज गर्दी केली आहे.

नाशकातील बी. डी. भालेकर मैदानावर महिंद्रा अँड महिंद्रा, एच ए एल, बॉश, महिंद्रा सोना आदी कारखान्यांद्वारे सार्वजनिक गणेशोस्तवात निरनिराळे देखावे सादर करण्यात येतात. देखावे बघण्यासाठी कालही नागरिकांनी गर्दी केली होती त्याच प्रमाणे आजही गणेश भक्तांची भक्तांची गर्दी दिसून येत आहे. त्या मुळे या मैदानावर एक प्रकारच्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

त्याच प्रमाणे नाशकातील मेनरोड येथील गणेश मंडळांनी विविध देखावे सादर केले आहेत. मेनरोड परिसरातही नागरिकांची गर्दी बघावयास मिळत आहे. पंचवटी, हिरावाडी, मखमलाबाद, आडगाव भागात सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त धार्मिक, समाज प्रबोधनपर पौराणिक कथा, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीभ्रूण हत्या, महिला सक्षमीकरण, ऐतिहासिक व जिवंत देखावे साकारण्यात आले आहे. त्यासाठी देखावे बघण्यासाठी भक्तांची गर्दी झालीआहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...