Tuesday, February 3, 2026
HomeनगरCrime News : टोळक्याकडून डॉक्टरवर सावेडीत हल्ला

Crime News : टोळक्याकडून डॉक्टरवर सावेडीत हल्ला

गोंधळ घालणार्‍यांना जाब विचारल्याचे कारण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी उपनगरातील एकविरा चौक परिसरात असलेल्या हॉस्पिटल मध्ये मंगळवारी (16 सप्टेंबर) रात्री घडलेल्या घटनेत डॉक्टरला चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली असून रोज त्रास देऊ अशी धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉ. विश्वनाथ पांडुरंग काळे (वय 50, रा. पाईपलाईन, हाडको, सावेडी) असे मारहाण झालेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (17 सप्टेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सोमनाथ गुंजाळ (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व त्याच्या सोबतच्या तीन अनोळखी विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटल असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून गोंधळाचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी सुरक्षारक्षकासह तपासणी केली असता, सोमनाथ गुंजाळ व त्याचे तिघे साथीदार वरच्या मजल्यावर असल्याचे दिसून आले.

YouTube video player

तेव्हा शेजारील संगणक दुकानदार विशाल ढापसे यांनी गोंधळाबद्दल प्रश्न केला असता, संतप्त झालेल्या सोमनाथ गुंजाळ व त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ केली. त्यानंतर चौघांनी मिळून डॉ. काळे व विशाल ढापसे यांना मारहाण केली. मारहाणीत डॉ. काळे जखमी झाले. मारहाण करत असताना संशयित आरोपींनी तुमचा दवाखाना कसा चालतो ते पाहतो, आता रोज त्रास देतो अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

अवैध धंदे, मद्यपींचा धुमाकूळ
एकविरा चौकातील म्हाडाच्या बिल्डिंग परिसरात चालू असलेल्या अवैध धंद्यांचा त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षकांंना यापूर्वीच निवेदन दिले होते. अवैध धंद्यांबरोबरच बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये अनेकजण मद्यपान करून गोंधळ घालतात. आरडाओरड करून शिवीगाळ करतात. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने आता आंदोलन करण्याचा निर्णय परिसरातील नागरिकांनी घेतला आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा...