Sunday, November 17, 2024
HomeनाशिकNashik Rain News : जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गंगापूर धरण 'इतके' टक्के...

Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले

नाशिकला आज ऑरेंज अलर्ट

नाशिक | Nashik

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत कालपासून संततधार पाऊस सुरु असल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर गंगापूर, दारणा, नांदूरमध्यमेश्वर, कडवातून विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची संततधार; गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ

जिल्ह्यातील ग्रामीण भागांत जोरदार पाऊस (Rain) सुरु असल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा (Gangapur Dam) पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून आज दुपारी १२ वाजता एकूण ५०० क्यूसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे. तर दुपारी ३ वाजता एकूण १००० क्यूसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्याने एकूण विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : Video : पिंपळद-ब्राह्मणवाडे पुलावर पाणी; ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास

या’ धरणांतून विसर्ग सुरु

आज सकाळी ७ वाजता पालखेड धरणातून २ हजार १३१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी ९ वाजता त्यामध्ये २ हजार ३८७ क्यूसेकने वाढ करून एकूण ५ हजार ५७० क्यूसेकने कादवा नदीत विसर्ग सोडण्यात आला. तर सकाळी ९ वाजता कडवा धरणातून ८ हजार २९८, दारणातून २२ हजार ९६६, भावलीतून १ हजार ८२१, भाम धरणातून ५ हजार ९२० तर पुनद धरणातून ५ हजार ४४० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग

गोदामाई खळाळली

दोन दिवसांपासून नाशिक शहरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने गोदाघाटावर पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. रामकुंडावरील अनेक छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे. तसेच गोदाघाट परिसरातील दुकाने देखील प्रशासनाकडून हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर आज दुपारी १२ आणि ३ वाजता गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येणार असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : सुरगाणा तालुक्यात धुव्वाधार पाऊस

नाशिकला आज ‘ऑरेंज अलर्ट’

हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) आज (रविवार) ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दर्शविण्यात आला आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. तसेच घाटमाथ्यासह डोंगरदऱ्यांच्या दुर्गम तालुक्यांच्या परिसरात खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर शहरात सातत्याने पाऊस सुरु असल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.तर गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होऊ लागल्याने पाणीपातळीत भर पडली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत गोदावरीच्या होळकर पुलाखालून ५११ क्युसेक इतके पाणी रामकुंडात प्रवाहित झालेले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या