Thursday, May 2, 2024
Homeनाशिकगंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्यात कचऱ्याचे साम्राज्य

गंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्यात कचऱ्याचे साम्राज्य

पंचवटी | Panchavti

घरातील कचरा साठवून तो घंटागाडी (Ghantagadi) आल्यानंतर तिच्यात टाकण्याची सुविधा उपलब्ध असताना झोपडपट्टीच्या (Slum Area) भागात कचरा थेट गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) डाव्या तट कालव्यात टाकण्यात येत आहे.

- Advertisement -

फुलेनगर झोपडपट्टीच्या (Phulenagar slum area) भागात पेठरोड ते दिंडोरी रोड (Pethroad To dindori Road) दरम्यानच्या कालव्याच्या भागात साचलेले पाणी आणि त्यावर तरंगणारा कचरा, सडून तळात पडलेला कचरा यांच्यामुळे घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य या परिसरात झाले आहे.

पंचवटी परिसरातून (Panchavti Area) वाहत जाणारा हा कालवा मखमलाबाद शिवारातून (Makhamalabad Shiwar) पेठरोड, दिंडोरी रोड, वज्रेश्वरी झोपडपट्टी हिरावाडी, विजयनगर कॉलनी, निलगिरी बाग, नांदूर व मानूर या महापालिकेच्या (Nashik NMC Border) हद्दीतून जातो. त्यात फुलेनगर, वज्रेश्वरी व निलगिरी बाग या तीन झोपडपट्ट्यांच्या भागातून हा कालवा जातो.

या झोपडपट्टीच्या भागांसह हिरावाडी या लोकवस्तीच्या (Hirawadi Area) भागात कालव्यात मोठ्या प्रमाणात कचरा फेकण्यात येत आहे. त्यामुळे या भागात हा कालवा नसून कचराकुंडीसाठी हक्काची जागाच असल्याची जाणवते. फुलेनगर झोपडपट्टीच्याजवळ येथे असलेल्या जलशुध्दीकरण केंद्रातून 9Water Treatment Plant) जाणारी जलवाहिनीही या भागातून मेरी परिसराकडे (Meri area) जाते. कालव्यावरून जाणारी ही जलवाहिनी फोडून त्यातून पाणी पिण्यासाठी तसेच भांडी धुणे व कपडे धुणे यासाठी यातील पाणी वापरण्यात येते.

त्यामुळे कालव्याच्या पेठरोड ते दिंडोरी या भागात कायम पाणी साचलेले असते. या साचलेल्या पाण्यात या परिसरातील कचरा सर्रासपणे फेकण्यात येत आहे. त्यातील बहुतांशी कचरा सडून त्याची दुर्गंधी पसरते. प्लास्टिक व थर्मोकॉलचा कचरा पाण्यावर तरंगत असतो. कालव्याला आवर्तन सुटल्यानंतर हा कचरा वाहून पुढे शेतात जातो.

त्यामुळे शेतात गेल्या काही वर्षांपासून पाण्यासोबत वाहून आलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या वाढत आहे. कालव्यात साचून राहणारा कचरा व गाळ काढण्याचे काम पांटबंधारे खात्याकडून दरवर्षी केले जाते. हा कचरा जेसीबीच्या साह्याने काढून तो याच परिसराच्या भागात टाकण्यात येत असल्याने त्याचे कालव्याच्या किनाऱ्यावर ढिग पडलेले दिसतात. कालव्याच्या दोन्ही बाजूला झोपड्या उभारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या भागात कालव्याचा रस्यावर अतिक्रमण झालेले आहे. त्याच भागातून कचरा फेकण्याचे प्रकार रोज होत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या