Friday, May 3, 2024
Homeनगरगॅसधारकाचे रेशन धान्य बंद करण्याचे राज्य सरकारचे आदेश

गॅसधारकाचे रेशन धान्य बंद करण्याचे राज्य सरकारचे आदेश

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राज्य सरकारने अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सुरू केली असून या अंतर्गत घरगुती गॅस धारकांसह लाखाच्या वर उत्पन्न असणार्‍या

- Advertisement -

निमशासकीय व खासगी नोकरीस असणारांनाही रेशनपासून वंचित केले जाणार आहे. पंतप्रधान नरेद्रं मोदी यांनी गोरगरीबांना उज्वला गॅस योजनेतून मोफत गॅस वाटप केले. मात्र गॅस मिळून वर्ष होत नाही तोच गॅसमुळे रेशन बंद होणार असल्याने गोरगरीबांना हे मोफतच्या गॅस कनेक्शनचा फटका बसणार आहे. या धोरणात शासनाने बदल करण्याची मागणी होत आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिनियम 2015 च्या तरतुदीनुसार राज्यात दि. 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल दरम्यान अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत डबल शिधापत्रीका बरोबर शासकीय, निमशासकीय तसेच खासगी नोकरीला असणारे ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्या पुढे आहे त्यांचे रेशनवरील धान्य बंद करण्यात येणार आहे.

तसेच ज्या कार्ड धारकांकडे घरगुती गॅस आहे, अशा गॅस धारकांचे रेशनही बंद करण्यात येणार आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी उज्वला गॅस योजने अंतर्गत गरीब कुटुंबाना मोठ्या प्रमाणात मोफत घरगुती गॅस कनेक्शनचे वाटप केले होते. अशा गॅस धारकांचे रेशनही या निर्णयामुळे बंद होणार आहे. राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय गोरगरीबांवर अत्यंत अन्यायकारक असल्याने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागाणी लाभार्थ्यांमधून होत आहे.

केंद्र सरकारने गोरगरीब महिलांना उज्वला गॅस योजने अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले. अनेक माता भागिनींना त्यांचा लाभ झाला. मात्र राज्याने अचानक गॅस धारकांचे धान्य बंद करण्याचा निर्णय घेतला. धान्य बंद करण्याच्या निर्णयामुळे गोरगरीब कुंटुबांना या चुकीच्या धोरणाचा फटका बसणार असून धान्यच मिळणार नसल्याने या गॅसचे काय करायचे असा प्रश्र निर्माण झाला आहे. सरकारने हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा.

– अशोक घोरपडे, पिंपरी निर्मळ

- Advertisment -

ताज्या बातम्या