Wednesday, February 19, 2025
Homeक्राईमगावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद

गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद

एलसीबीची तिसगावमध्ये कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक गुन्हे शाखेने तिसगाव (ता. पाथर्डी) येथे कारवाई करत गावठी कट्टा बाळगून विक्री करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांना ताब्यात घेत जेरबंद केले. या कारवाईत एक कट्टा, एक जिवंत काडतुस, दुचाकी असा 1 लाख 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

ज्ञानेश्वर बाळू बुधवंत (वय 25 रा. शिरापूर, ता. पाथर्डी) व अशोक बापू महाडीक (वय 25, रा. शिरापूर, झोपडपट्टी, ता. पाथर्डी) अशी जेरबंद केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणार्‍या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक नियुक्त करण्यात आले आहे. पथक तिसगाव परिसरात गुप्त माहिती घेत असताना, ज्ञानेश्वर बाळू बुधवंत हा साथीदारांसह गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार शिरापूर-तिसगाव रस्त्यावर सापळा रचण्यात आला. संशयित दुचाकी थांबवून तपासणी केली असता, ज्ञानेश्वर बुधवंत व त्याचा साथीदार अशोक महाडीक यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता गावठी कट्टा अमोल गर्जे (रा. शिरसाठवाडी, ता. पाथर्डी) याच्याकडून विक्रीसाठी आणला होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या