Sunday, May 3, 2026
Homeक्राईमCrime News : पाच गावठी पिस्टल, नऊ जिवंत काडतूसांसह तीन जण जेरबंद

Crime News : पाच गावठी पिस्टल, नऊ जिवंत काडतूसांसह तीन जण जेरबंद

श्रीरामपूर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील गुन्हेगारी (Criminality) मोडून काढण्यासाठी पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली असून, आज मंगळवारी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) पाच गावठी पिस्तूल (Gavthi Pistol) आणि नऊ जीवंत काडतूसासह (Live Cartridge) तीन आरोपींना जेरबंद (Arrested) केले. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षण किरणकुमार कबाडी व त्यांच्या पथकाने सदरची कारवाई पार पाडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार कबाडी यांना श्रीरामपूरमध्ये गावठी पिस्टल विक्रीसाठी तीन जण हे हरेगाव फाट्यामार्गे येणार असल्याची गुप्त माहीती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हरेगाव फाटा (Haregav Phata) येथे जाऊन सापळा लावला.

- Advertisement -

काही वेळाने एका पल्सर मोटरसायकल (क्र. एमएच 17 डीजी 5767) हिच्यावर आलेल्या तीन जणांना पथकाने थांबविले. त्यांची झडती घेतली असता पाच गावठी पिस्टल (Gavthi Pistol), नऊ जीवंत काडूतसे त्यांच्याकडे मिळून आली. पोलिसांनी त्यांच्याकडून वरील मुद्देमालासह एक पल्सर मोटरसायकल असा सुमारे 4 लाख 9 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच अक्षय उर्फ भावड्या संजय माळी (वय 23, रा- फत्तेपुर, ता-नेवासा), अजय शिवाजी मगर (वय 25, नांदूर शिखरी, ता- नेवासा), योगेश मच्छिंद्र निकम (वय 35, रा- वडगाव गुप्ता, ता- अ. नगर) या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज व्यवहारे, अतुल लोटके, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जून बनकर, दिपक घाटकर, फुरकान शेख, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे आदींच्या पथकाने पार पाडली.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, शहरात पिस्तूल (Pistol) घेऊन पाठलाग करण्याचा जो प्रकार झाला, तो प्रकार पुन्हा होऊ नये, त्यादिशेने प्रयत्न सुरु असून, श्रीरामपुरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केलेली आहे, त्यासाठी वेळ पडली तर अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

0
बारामती | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू...