Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत 'इतक्या' विषयांना मंजुरी

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘इतक्या’ विषयांना मंजुरी

नाशिक | प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची कामे केल्यानंतर त्याच्या दोष निवारणाचा कालावधी वाढवून तो तीन वर्षे करण्याचा तसेच रस्ते कामांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी जलजीवन मिशनप्रमाणे अ‍ॅप तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी दिल्या.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. या सभेत ९२ विषय मांडण्यात आले होते. त्यातील ९१ विषयांना मंजुरी दिली. सर्वसाधारण सभेत श्रीमती मित्तल यांनी बांधकाम विभागाकडून केल्या जात असलेल्या कामांच्या दर्जाबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या तिन्ही बांधकाम विभागाकडून दरवर्षी साधारणपणे दोनशे कोटींच्या रस्त्यांची कामे केली जातात. या कामांच्या दर्जाबाबत अनेकदार तक्रारी होऊनही त्यात काहीही सुधारण होत नाही. सध्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने रस्त्याचे काम केल्यानंतर त्या रस्त्याचा दोष निवारण कालावधी दोन वर्षांचा आहे.

या दोन वर्षांच्या काळात त्या रस्त्याबाबत काही दोष निर्माण झाल्यास ठेकेदाराने त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असते. मात्र, जिल्हा परिषदेत कधीही कोणत्याही ठेकेदाराने या कालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्यास त्याची दुरुस्ती केल्याचे दिसत नाही. या दोष निवारण कालावधीच्या नियमाचे बांधकाम विभागाकडून कधीही पालन केले जात नाही. या काळात रस्ता नादुरुस्त होत नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येते. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा कालावधी वाढवून तो तीन वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेऊन यापुढे टेंडर प्रसिद्ध करताना त्यात या बाबीचा समावेश करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.बांधकाम विभागाचे रस्ते प्रत्यक्ष जागेवर कशा पद्धतीने झाले. त्यांचे काम पूर्ण झाले का? कामाचा दर्जा कसा आहे, याबाबत मुख्यालयात बसून काहीही समजत नाही. शाखा अभियंत्यांनी तयार केलेल्या देयकांनुसार वरिष्ठ अधिकारी सह्या करतात. यामुळे वडबारे येथील रस्त्याप्रमाणे प्रकार घडत असतात.

याला आळा घालण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बांधकाम विभागाकडून केल्या जात असलेल्या कामांची प्रगती समजावी, यासाठी जलजीवन मिशनच्या कामांप्रमाणे एक अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. जलजीवन मिशनच्या पमध्ये पाणी पुरवठा योजनांच्या प्रत्येक टप्प्यावरील कामाचे फोटो, व्हिडिओ अपलोड केले जातात. यामुळे त्या कामासाठी वापरलेल्या वस्तूंचा दर्जा समजतो.

तसेच काम पूर्ण झाल्यानंतर त्याचेही फोटो टाकले जातात. तसेच अधिकार्‍यांनी या कामाला भेट देऊन तपासणी केल्यानंतर त्यांचेही व्हिडिओ अपलोड केले जातात. त्याच पद्धतीने बांधकाम विभागाकडून केल्या जाणार्या प्रत्येक कामाचे प्रत्येक टप्प्यावरील व्हिडिओ, छायाचित्र अपलोड करता येतील, असे अ‍ॅप तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या