Friday, May 3, 2024
Homeजळगावमिरवणुकीआधीच बामोशी बाबांच्या तलवारीचे दर्शन घ्या एका क्लिकवर

मिरवणुकीआधीच बामोशी बाबांच्या तलवारीचे दर्शन घ्या एका क्लिकवर

चाळीसगाव | प्रतिनिधी | Chalisgaon

चाळीसगाव हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेल्या येथील पीर मुसा कादरी बाबा उर्फ बामोशी बाबा यांचा उरुसला ५ फेब्रुवारी पासून सुरूवात झाली आहे. उरुसातील सर्वात महत्वाची तलवारी मिरवणूक आज (दि,७) सायंकाळी निघणार आहे…

- Advertisement -

त्याआधीच पूज्य तलवार मातेचे दर्शन घेण्याची संधी आम्ही ‘ देशदूत ’तर्फे भाविकांना देत आहोत. मिरणुकीसाठी यंदा सुरगाणा संस्थानचे श्रीमंत कुमार महाराज रोहीत राजे पवार देशमुख हे शहरात दाखल झाले आहेत. तर तलवारीसाठी हजारो भाविकांची गर्दी उसळणार असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेल्या बामोशी बाबा यांचा उरुसला यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. ५ रोजी बांबाचे समाधी शाही स्नान घालण्यात आले. तर ६ फेब्रुवारीला संदल मिरवणूक निघाली. उरुसालातील भाविकांचे श्रद्धा व आकर्षण असलेली पूज्य तलवार मिरवणूक आज दि,७ फेब्रुवारी रोजी जुन्या नगरपालीकेजवळील तलवार भवन येथून भालचंद्र देशमुख यांच्या निवासस्थानापासून सायंकाळी ६ वाजता निघणार आहे.

यावेळी सुरगाणा संस्थानचे श्रीमंत कुमार महाराज रोहीत राजे पवार देशमुख यांची उपस्थिती असणार आहे. यंदा पूज्य तलवारीचे मान देशमुख घरण्यातील गोकुळ शरद देशमुख यांना मिळला आहे. आज पूज्य तलवार मातेला संकाळी ६ वाजता शाही स्नान घालण्यात आलेे. त्यानतंर सायंकाळी पुन्हा विधीवत पूजा-अर्चा करुन तलवार मिरवणूक निघणार आहे. ढोला-ताशाच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक दर्गापर्यंत नेण्यात येणार आहे.

परंतू त्या आधी देशदूततर्फे आम्ही भाविकांना पूज्य तलावार मातेचे दर्शन व्हिडीओ व फोटोच्या माध्यमातून घडवून आनत आहोत. आज संकाळपासून तलवार मातेचे दर्शन घेण्यासाठी तलवार भवन येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तर सायंकाळी हजारोच्या संख्येने भाविक मिरणूकीत शामिल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उरुस व तलावार मिरवणूकीच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला असून त्यासाठी सुमारे २०० पोलीस कर्मचारी व १५ अधिकारी असतील. देखरेखीसाठी दर्गा परिसरात ठिकठिकाणी १२ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वीत असून वायरलेस यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या