Friday, May 3, 2024
Homeनगरघोडेगावात कांद्याने ओलांडला 6 हजारांचा टप्पा

घोडेगावात कांद्याने ओलांडला 6 हजारांचा टप्पा

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल 5 हजार 500 रुपयांपर्यंत कांदा विकला गेला.

- Advertisement -

काही वक्कलांना 6 हजार 100 रुपये भाव मिळाला. या वर्षीच्या कांदा भावाचा हा उच्चांकी भाव ठरला आहे.

काल कांद्याची दीडशे वाहनांतून 27 हजार 613 गोण्या आवक झाली. शनिवारच्या तुलनेत ती 827 गोण्या कमी होती. एक नंबर कांद्याला 4500 ते 5500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दोन नंबरला 4000 ते 4300 रुपये, गोल्टी कांद्याला 3500 ते 3700 रुपये भाव मिळाला.

तीन नंबरच्या कांद्याला 500 ते 1300 रुपये भाव मिळाला. सुपर बिग क्वॉलिटीच्या एक-दोन वक्कलांना 6100 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

शेतकर्‍यांकडे सध्या कांदा राहिलेला नाही. नगर जिल्ह्यात पावसामुळे लाल कांदा येऊ शकला नाही. त्याचबरोबर उन्हाळी कांदाही खराब वातावरणामुळे निम्म्याहून अधिक सडला. त्यामुळे शेतकर्‍यांना तो लवकर विकावा लागला.

त्यापैकीच काही शिल्लक राहिलेल्या मोजक्याच शेतकर्‍यांकडे सध्या कांदा असून त्यामुळे भावात वाढ झाली असली तरी कांदाच नसल्याने मार्केटमध्ये आवकेत घट सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या