Thursday, May 2, 2024
Homeजळगाव42 कोटींच्या कामाची पुन्हा फेर निविदा

42 कोटींच्या कामाची पुन्हा फेर निविदा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

महापालिकेत नगरसेवकांची शुक्रवारी बैठक माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत घेण्यात येवून विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

महापालिकेच्या 42 कोटींच्या निधीतील कामांबाबत शुक्रवारी महापालिकेत मात्र , शासनाने या प्रकरणी अगोदर काढण्यात आलेली निविदा रद्द केली असून, पुन्हा फेर निविदा काढण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली. याबाबत राज्यशासन व मंत्रालयात पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आ. महाजन यांनी दिले.

महापालिकेच्या 17 मजली इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात झालेल्या बैठकीत माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, मनपा स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी, सभागृहनेते ललित कोल्हे, गटनेते भगत बालानी, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या नगररचना विभागात अनेक फाईली पडूनच

महापालिकेच्या नगररचना विभागात अनेक फाईली काही महिन्यांपासून प्रलंबित असल्याच्या तक्रारी वाढत असून, आपल्या कामाची पद्धत सुधारावी, अशा सूचना आमदार महाजन यांनी दिल्या. संथगतीने सुरु असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामासह शहरातील अनेक समस्यांबाबत सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी आज आमदार गिरिश महाजन यांच्यासमोर पाढा वाचला.

सत्ताधारी भाजपला बदनाम करण्यासाठी विकास कामांना उशीर केला जात असल्याचा आरोप भाजपचे गटनेते भगत बालानी यांनी केला. यावेळी आ. महाजन यांनी अमृत योजनेचे काम मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला दिल्यात.

कोविड सेंटर वाढविण्याच्या दिल्या सूचना

आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नवीन 200 बेडचे केंद्र सुरु करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. तसेच डॉक्टर, नर्स, इतर आरोग्य कर्मचार्‍यांची कमतरता असल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी आ. महाजन यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर उपाययोजना म्हणून लवकरच बेडची संख्या वाढवून अजून कोविड सेंटर सुरू करण्याचा सूचना आमदार गिरीश महाजन यांनी दिल्या. तसेच जास्तीत जास्त टेस्ट शहरात सुरू करण्याचा सुचनाही त्यांनी दिल्या. मेडिकल स्टाफ कमी असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या