Thursday, March 13, 2025
Homeक्राईमखून झालेल्या युवकाच्या प्रेयसीची आत्महत्या

खून झालेल्या युवकाच्या प्रेयसीची आत्महत्या

राहत्या घरात घेतला गळफास || खांडवी येथील घटना

कर्जत |तालुका प्रतिनिधी| Karjat

बीड येथील युवक रणजीत गिरी याच्या खून करून त्याचा मृतदेह कुकडी कालव्यामध्ये फेकून देण्यात आल्याची घटना 23 डिसेंबर रोजी घडली होती. दरम्यान, त्याच्या प्रेयसीने राहत्या घरात गळफास घेतला. कर्जत तालुक्यातील खांडवी येथे 25 डिसेंबरला दुपारी दोन वाजता ही घटना घडली. यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. बीड येथील रणजीत सुनील गिरी या युवकाचा नाजूक संबंधांमधून मारहाणीनंतर त्याला दोरीने गळफास देऊन खून करण्यात आला व पुरावा नष्ट करण्यासाठी कुकडी कालव्यामध्ये फेकून देण्यात आला होता.

- Advertisement -

मात्र नांदगाव गावाच्या शिवारामध्ये कालव्यामधून मृतदेह वाहून जात असताना नागरिकांनी पाहिला आणि याबाबत तात्काळ पोलिसांना कळवले. हा खून प्रेम संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी संतोष बाबुराव जाधव (रा.खांडवी, ता. कर्जत), ऋषिकेश रवी बोरकर (रा.वडझिरे, ता. पारनेर), उद्धव उर्फ संतोष मांडगे (रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) आणि खांडवी येथील महिलेला अटक केली होती. दरम्यान, याप्रकरणी ज्या युवतीच्या प्रेमप्रकरणामुळे हे सर्व प्रकरण घडले तिने बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ मिरजगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये युवतीचा मृतदेह मिरजगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...