Monday, September 28, 2026
HomeनाशिकNashik Accident News : चहाची टपरी उघडण्यासाठी निघाल्या अन् काळाने घाला घातला;...

Nashik Accident News : चहाची टपरी उघडण्यासाठी निघाल्या अन् काळाने घाला घातला; हायड्रा क्रेनच्या धडकेत महिलेचा मृत्यू

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

काल (मंगळवारी) सायंकाळच्या सुमारास झालेल्या एका अपघातात (Accident) ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू (Woman Dies) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गयाबाई काशिनाथ बोडके (५६, रा. रोप्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी, चुंचाळे शिवार) या आपल्या रोजच्या कामासाठी एमआयडीसी परिसरातील चहाची टपरी उघडण्यासाठी निघाल्या होत्या. सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान त्या हॉटेल वेलकम जवळ रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या हायड्रा क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गयाबाई बोडके या जागीच कोसळल्या.

अपघातानंतर (Accident) काही क्षण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा मोहन बोडके घटनास्थळी पोहोचला. त्याने तातडीने आपल्या आईला जिल्हा शासकीय जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, गयाबाई बोडके या अंबड औद्योगिक वसाहतीत चहाची टपरी चालवत होत्या आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्या नेहमीप्रमाणे टपरी उघडण्यासाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला असून, अपघातास कारणीभूत असलेल्या हायड्रा क्रेन चालकाचा शोध घेण्यात येत आहे. तर पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...