Friday, May 3, 2024
Homeनाशिकगोदामाईमुळे आमचा उदरनिर्वाह

गोदामाईमुळे आमचा उदरनिर्वाह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गोदावरी नदी पात्र तळाचे काॅक्रिटीकरण काढण्याचे काम सुरु आहे. रामकुंड तळाचे काॅक्रटिकरण देखील काढले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी उपजिविकेसाठी अवलंबून असलेल्या अनेकांची उपासमार होणार आहे. या ठिकाणी तीस ते चाळीस लहान व मोठी मुले भाविकांनी नदीपात्रात टाकलेली पैसे काढून, तांबे व चांदीची नाणी व वस्तू काढण्याचे काम करुन पैसे कमवतात.

- Advertisement -

नाशिककरांसाठी जीवनदायनी असलेली गोदामाई अनेकांची उपजीविका भागवते. रामकुंड व गोदातीरी दररोज शेकडो भाविक धार्मिक विधीसाठी या ठिकाणी येतात. पुजा अर्चा, नदीत दिप अर्पण करुन नाणे अर्पण करतात. या ठिकाणी आदिवासी जिवरक्षक दलाची मुल भाविकांना धार्मिक विधीसाठी मदत करतात. या ठिकाणी येणार्‍या भाविकांकडून या मुलाना दहा वीस रुपयांची मदत दिली जाते.

तसेच भाविक नदीत दिवा अर्पण करताना पैसे देखील टाकतात. काही जण तांब्याचा दिवा अर्पण करतात. या ठिकाणी असलेली मुले नदीत अर्पण केलेले पुजेचे साहित्य बाहेर काढतात. नदी पात्रात टाकलेली नाणे बाहेर काढतात. तांब्याच्या वस्तू असेल तर मोडीत देऊन पैसे घेतात.

दिवसभरात शंभर ते दीडशे रुपये या माध्यमातून ही मुले कमवतात. गोदामाईच या मुलांची उपजीविका आहे. मात्र आता गोदा नदिपात्राचे काॅक्रिटिकरण काढण्याचे काम सुरु आहे. रामकुंडाच्या तळाचे देखील काॅक्रिटीकरण काढले जाणार आहे. या कामाला एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे उपजीविका चालवायची कशी असा प्रश्न या मुलांना पडला आहे.

रामकुंडावर येणार्‍या भाविकांना धार्मिक विधीसाठी मदत करतो. काहीजण या ठिकाणी फुल व पुजेचे साहित्य देखील विकतात. नदीपात्रात भाविकांनी टाकलेले पैसे गोळा करतात. या माध्यमातून आमची रोजीरोटी सुरु असते. मात्र रामकुंड व नदीपात्राचे काॅक्रिटिकरण काढण्याच्या कामामुळे आमच्या उपजिविकेवर परिणाम होणार आहे.

– मुरली खाडम, आदिवासी जीवरक्षक दल

- Advertisment -

ताज्या बातम्या