Wednesday, October 28, 2026
HomeनगरCrime News : बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरले

Crime News : बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नागरदेवळे (ता. अहिल्यानगर) येथील शुकलेश्वर मंदिराजवळ बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेचार तोळ्याचे सोन्याचे आणि पाच भाराचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत चोरट्यांनी एकूण 1 लाख 37 हजार 500 रूपये किमतीचे दागिने लंपास केले.

- Advertisement -

याप्रकरणी अंबिका जयदत्त गोंधळे (वय 25, रा. शुकलेश्वर मंदिराजवळ, नागरदेवळे) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रविवारी (25 ऑक्टोबर) फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (24 ऑक्टोबर) सकाळी 11.30 ते दुपारी 2.15 वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. फिर्यादी यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी 10 ग्रॅम वजनाची सोन्याची एक अंगठी, 15 ग्रॅम वजनाचा सोन्याचा सर, 15 ग्रॅम वजनाची दोन सोन्याची मंगळसूत्रे, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने, एक ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या नथी, तसेच पाच भाराचे चांदीचे पैंजण व तोडे असा एकूण 1 लाख 37 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला.

सदरचा प्रकार दुपारी 2:15 वाजता उघडकीस आल्यानंतर गोंधळे यांनी कॅम्प पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिलीप शिंदे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपूरकरांना मिळणार आठ दिवसांनी पाणी!

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur सलग 365 दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या श्रीरामपूर नगर परिषदेवर आठ दिवसांतून एकदा म्हणजे दर बुधवारी पाणी पुरवठा करण्याची नामुष्की श्रीरामपूर...