Tuesday, November 10, 2026
Homeक्राईमSangamner : जास्त सोन्याचे आमिष दाखवून फसवणारी टोळी जेरबंद

Sangamner : जास्त सोन्याचे आमिष दाखवून फसवणारी टोळी जेरबंद

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

जास्त सोने देण्याचे आमिष दाखवून महिलांसह नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या कारवाईत घारगाव, नेवासा, कोपरगाव तालुका आणि मिरजगाव येथील चार गुन्हे उघडकीस आले असून, 6 लाख 60 हजार रुपये किमतीची 44 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

30 सप्टेंबर रोजी चिखलठाण (ता. राहुरी) येथील सोपान पोपटराव डोलनर यांच्या आई साकूर बसस्थानकावर बसलेल्या असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना भुरळ घालून फसवले. जास्त सोने देण्याचे आमिष दाखवून त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र घेतले. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक नियुक्त केले. रविवारी (दि.11) गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना सचिन संजय गायकवाड (रा. औरंगपूर, ता. शिरूर, जि. बीड) याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला खरवंडी (ता. पाथर्डी) परिसरातून ताब्यात घेतले.

चौकशीत सचिन गायकवाड याने संतोष मोहनराव चिंतामणी (रा. नाळवंडी नाका, बीड), शहादेव रामदास जाधव (रा. वडवणी, जि. बीड) आणि आबा तुपे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. औरंगपूर, ता. शिरूर, जि. बीड) यांच्यासह गुन्हा केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संतोष चिंतामणी यालाही ताब्यात घेतले. अन्य दोन आरोपी फरार आहेत. पुढील चौकशीत मिरजगाव (ता. कर्जत), नेवासा आणि चांदेकसारे (ता. कोपरगाव) येथेही जास्त सोने देण्याचे आमिष दाखवून सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले.

या तपासातून संबंधित पोलीस ठाण्यांतील आणखी तीन गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी या गुन्ह्यांशी संबंधित 6 लाख 60 हजार रुपये किमतीची 44 ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली. पुढील तपासासाठी आरोपींना मुद्देमालासह मिरजगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. सदर कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले, राहुल द्वारके, गणेश लोंढे, विशाल तनपुरे, रोहित मिसाळ, भगवान सानप, फुरकान शेख आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

सतेज

उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत; सतेज पाटलांचे...

0
कोल्हापूर | Kolhapurगोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना...