Tuesday, June 16, 2026
HomeनगरCrime News : सोन्याच्या व्यापार्‍यांकडून तब्बल 1.90 कोटींची फसवणूक!

Crime News : सोन्याच्या व्यापार्‍यांकडून तब्बल 1.90 कोटींची फसवणूक!

महिलेला जातीवाचक शिवीगाळ || मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील केडगाव परिसरात राहणार्‍या महिलेची सोन्याच्या व्यवसायाच्या व्यवहारातून तब्बल 1 कोटी 90 लाख रूपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर पैशांची मागणी केल्यावर महिलेसह तिच्या मुलीला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात 42 वर्षीय महिलेने शनिवारी (30 ऑगस्ट) रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हिमेश दिलीप पोरवाल, प्रतिक्षा दिलीप पोरवाल, अनिता दिलीप पोरवाल, मुन्ना खंडेलवाल, यश साखरिया, सांची साखरिया, शुभम खंडेलवाल व हिमेश पोरवाल याची आत्या (नाव माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोेपींची नावे आहेत. 2020 मध्ये दिवंगत सोनार दिलीप पोरवाल यांचा मुलगा हिमेश पोरवाल याच्याशी फिर्यादीची ओळख झाली. सोन्याचे व्यवहार, मुंबईतील अडकलेले सोने सोडवण्यासाठी आर्थिक मदत या बहाण्याने हिमेशने फिर्यादीकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. फिर्यादी व त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींनी रोकड तसेच गहाण ठेवलेले दागिने मिळून एकूण 1 कोटी 90 लाख रूपयांची मदत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्याबदल्यात काही धनादेश दिले गेले; मात्र नंतर व्यवहार न पूर्ण करता संशयित आरोपी गायब झाले.

दरम्यान, फिर्यादीने पैसे व दागिन्यांची मागणी करण्यासाठी 6 जुलै रोजी संशयित आरोपींच्या घरी भेट दिली असता, हिमेश पोरवाल, पत्नी प्रतिक्षा, आई अनिता, बहिण सांची, सासरे मुन्ना खंडेलवाल, दाजी यश पोरवाल व नातेवाईक शुभम खंडेलवाल यांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या मुलीवर हल्ला केला. फिर्यादींना मारहाण करून गळा दाबला, मुलीचे कानातील दागिने हिसकावले. जातीवाचक शिवीगाळ करीत तुम्हाला संपवायला वेळ लागणार नाही, आमचे मोठ्या राजकारण्यांशी संबंध आहेत, पोलीस आमचे काही वाकडे करू शकत नाहीत अशी धमकी दिली. हल्ल्यानंतर जखमी झालेल्या फिर्यादीने प्रचंड मानसिक तणावामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले व उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण-२०२६ जाहीर

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai राज्याच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरुपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण - २०२६ ला मंगळवारी...