Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशसोन्या-चांदीच्या दरात वाढ

सोन्या-चांदीच्या दरात वाढ

नवी दिल्ली | New Delhi –

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या मागणीमुळे सोन्या-चांदीच्या दरात सलग तिसर्‍या दिवशी वाढ झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात

- Advertisement -

329 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर सोन्याचे दर 51 हजार 575 रूपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले. तर दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याचे दर 48 हजार 660 रूपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचे दर 39 हजार 780 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले.

तर दिल्लीतही 24 कॅरेट सोनाच्या दरात 418 रूपयांची वाढ पाहायला मिळाली. त्यानंतर दिल्लीत सोन्याचे दर 52 हजार 963 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. सोन्यासोबतच चांदीच्या मागणीतही मोठी वाढ पाहायला मिळाली. मंगळवारी चांदीच्या दरात 2 हाजर 246 रूपयांची वाढ होऊन ती 72 हजार 793 प्रति किलोवर पोहोचली आहे. सोमवारी सोन्याचे दर 52 हजार 545 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 70 हजाप 547 रूपये प्रति किलोवर बंद झाली होती.

मंगळवारी मल्टिपल कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. एमसीएक्सवर ऑक्टोबर महिन्यात देण्यात येणार्‍या सोन्याच्या दरात 0.37 टक्क्यांची वाढ झाली असून ते 51 हजार 893 रूपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होऊन ते 1 हजार 988 रूपये प्रति औसवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरातही वाढ होऊन ते 28. 77 डॉलर्स प्रति औंस वर पोहोचले आहे. तर प्लॅटिनमच्या दरात 0.3 टक्क्यांची वाढ होऊन ते 931.87 डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या