Tuesday, May 7, 2024
Homeनगरगुन्हेगारासह सोने विकत घेणारा सोनार जेरबंद

गुन्हेगारासह सोने विकत घेणारा सोनार जेरबंद

अहमदनगर (प्रतिनिधी) –

ग्रामीण भागामध्ये दिवसा व रात्री घरफोड्या करणार्‍या एक सराईत गुन्हेगारासह चोरीचे सोने विकत घेणार्‍या सोनाराला स्थानिक

- Advertisement -

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. भगवान ईश्वर भोसले (वय 21 रा. बेलगाव ता. कर्जत), सोनार रामा अभिमन्यू इंगळे (वय 33 रा. पाडळी ता. शिरूर कासार जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीने नगर ग्रामीणसह पारनेर तालुक्यात घरफोड्या व जबरी चोरी केलेल्या 6 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 25 तोळे सोन्यासह, दोन वाहने, दोन मोबाईल असा 14 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रिमा वालचंद धाडगे (रा. वडगाव तांदळी ता. नगर) यांचे घर फोडून चोरट्यांनी 72 हजारांचा ऐवज लंपास केला होता. धाडगे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ग्रामीण भागात झालेल्या घरफोड्यांचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एलसीबीला दिल्या आहेत. धाडगे यांची घरफोडी भगवान भोसले व त्याच्या साथीदारांनी मिळून केली, भगवान भोसले व त्याचा भाऊ संदीप भोसले हे दोघे दुचाकीवरून चोरीचे सोने विक्रीसाठी शिरूर कासार येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली.

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, कर्मचारी सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, अण्णा पवार, संदीप दरंदले, शंकर चौधरी, दीपक शिंदे, जालिंदर माने, उमाकांत गावडे यांच्या पथकाला आरोपी अटक करण्याबाबत सूचना केल्या. पथकाने कडा ते शिरूर रस्त्यावर सापळा लावून भगवान भोसलेला अटक केली. त्याच्या सोबत असलेला भाऊ संदीप भोसले पसार झाला. आरोपीने वडगाव तांदळीसह इतर 6 गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. चोरी केलेले सोने राम इंगळे या सोनाराकडे विक्री करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी इंगळे याला अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या