Monday, June 15, 2026
Homeक्राईमShirdi : सराफ व्यापार्‍याच्या चोरी प्रकरणी मोठी कारवाई

Shirdi : सराफ व्यापार्‍याच्या चोरी प्रकरणी मोठी कारवाई

राहाता |प्रतिनिधी| Rahata

शिर्डी (Shirdi) येथील एका सराफ व्यापार्‍याचे दागिने चोरणार्‍या (Jewelery Thief) आरोपीकडून पोलिसांनी तब्बल 37 लाख 18 हजार 870 रुपये किमतीचे 391.460 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त (Gold Jewelry Seized) केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

- Advertisement -

विजयसिंह वसनाजी खिशी, मूळ रा. गुजरात, हे सोन्याच्या दागिन्यांचा घाऊक व्यवसाय करतात. 13 मे 2025 रोजी ते त्यांच्या चालक सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित (रा. राजस्थान) याच्यासह शिर्डीतील हॉटेल साई सुनिता येथे मुक्कामी असताना, चालकाने 3 कोटी 26 लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास करत आरोपी सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित याला गुजरात येथून ताब्यात (Arrested) घेतले. 17 ऑगस्ट 2025 रोजी त्याला न्यायालयात हजर करून 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशीतून त्याने चोरलेला मुद्देमाल राजस्थानमधील त्याच्या मूळ गावी, इब्रे का ताला, ता. चौहटन, जिल्हा बारमेर येथील शेतात लपवून ठेवल्याचे उघड झाले. त्यानुसार 20 ऑगस्ट रोजी पोलिसांनी 37 लाख 18 हजार 870 रुपये किमतीचे 391.460 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. यापूर्वी पोलिसांनी 2 कोटी 55 लाख 34 हजार 527 रुपये किमतीचे दागिने जप्त केले होते. त्यामुळे या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण 2 कोटी 92 लाख 53 हजार 397 रुपये किमतीचे 3130.106 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, उपनिरीक्षक निवांत जाधव, पो. कॉ. विजय धनेधर, पो.कॉ. केवलसिंह राजपुत यांनी केली.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...