Wednesday, September 30, 2026
HomeनगरLeopard News : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Leopard News : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

गोंडेगाव |वार्ताहर| Gondegaon

श्रीरामपूर-पुणतांबा रोडवर (Shrirampur Puntamba Road) गोंडेगाव परिसरातील चारी क्र 20 जवळ रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक (Vehicle Leopard Hit) दिल्याने यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

गोंडेगाव (Gondegaon) परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू आहे. या शिवारातील अनेक पाळीव कुत्रे, शेळ्या व कालवडी बिबट्याने फस्त केल्या आहे. बिबट्याच्या भितीमुळे शेतकरी रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाण्यास धजावत नाही. अनेकवेळा दिवसाही अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे.

सध्या या भागात मका व उसाच्या पिकात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. रात्रीच्यावेळेस बिबट्याचे अनेकांना रस्त्यावर दर्शन झालेले आहे. अशाचप्रकारे हा बिबट्या देखील रात्री रस्त्यावर आल्याने त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू (Leopard Death) झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक राहुल कानडे अक्षय बडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृत बिबट्याला ताब्यात घेतले. दरम्यान, हा मृत बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

Aaditya Thackeray : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी;...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असून प्रदीप पुर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्येमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या झाल्याचे पुन्हा...