Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रदिलासादायक : पुण्यात दिवसभरात ‘इतक्या’ रुग्णांना डिस्चार्ज

दिलासादायक : पुण्यात दिवसभरात ‘इतक्या’ रुग्णांना डिस्चार्ज

पुणे –

पुणे शहरात दिवसभरात नव्याने 391 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 457 करोनाबाधितांची नोंद झाली. जिल्ह्यातील या दोन्ही प्रमुख शहरांमधील आजची संसर्गाची आकडेवारी

- Advertisement -

ही गेल्या काही दिवसांतील आकडेवारीच्या तुलनेत कमी असल्याने ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.

पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 49 हजार 790 पोहोचली आहे. तर दिवसभरात 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 3 हजार 679 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 917 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आज अखेर 1 लाख 31 हजार 270 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तर पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 457 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 833 जण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 80 हजार 923 वर पोहचली असून यांपैकी 74 हजार 504 जण करोनातून बरे झाले आहेत.

दरम्यान, सध्या महापालिकेच्या रुग्णालयात सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 451 एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या