Saturday, May 16, 2026
Homeनाशिकदुकान फोडून दीड लाखांचे साहित्य चोरी

दुकान फोडून दीड लाखांचे साहित्य चोरी

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

- Advertisement -

येथील संगमनेर नाका परिसरातील नितिन मशिनरी या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी विद्युत मोटारींचे जवळपास दीड लाखांचे साहित्य चोरुन नेले. चोरी करताना चोरटे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

संगमनेर नाक्याच्या पुढे गेल्यावर देवनदीच्या पुलाजवळ हे दुकान आहे. मंगळवारी (दि.२७) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा वाकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील मोटारींसाठी लागणार्‍या जवळपास दीड लाखांच्या पितळी वस्तू चोरुन नेल्या. सकाळी नेहमीप्रमाणे दुकानदार दुकानावर आले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. सिन्नर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

सीसीटीव्ही कॅमेर्‍यात रेनकोट घातलेले व तोंडाला रुमाल बांधलेले तीघे जण दिसून आले. याआधीही या दुकानात चोरीचा प्रकार घडला होता. यामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीती पसरली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पंचवटीत सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा; महिलेवर प्राणघातक हल्ला...

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati पंचवटीतील हिरावाडी परिसरातील महालक्ष्मी नगर येथील 'समृद्धी ज्वेलर्स या दुकानावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ४ ते ५ अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला....