Wednesday, January 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजGopichand Padalkar: शरद पवारांवर टीका करताना गोपिचंद पडळकर यांची जीभ घसरली; म्हणाले,...

Gopichand Padalkar: शरद पवारांवर टीका करताना गोपिचंद पडळकर यांची जीभ घसरली; म्हणाले, १०० शकुनी मेल्यानंतर…

मारकडवाडी | Markadwadi
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधल्या मारकडवाडी गावात आज महायुतीची सभा होत आहे. या सभेत जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. १०० शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले आहेत. यांचे डोके बघा, धनगर समाज लोकशाही मनात नाही, असे भासवण्यात आलेय. या तुमच्या गावात आलो असल्याचे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

गोपिचंद पडळकर नेमके काय म्हणाले?
१०० शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले आहेत. यांचे डोके बघा, धनगर समाज लोकशाही मनात नाही, असे भासवण्यात आलेय. या विधानसभेत १०० गाव असताना नेमके माझ्याच मारकडवाडीला का पुढे करण्यात आले, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून आज सदाभाऊ खोत आणि मी या तुमच्या गावात आलो असल्याचे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले, अखंड राज्याचे आणि देशाचे लक्ष आज मारकडवाडीकडे लागून राहिले आहे. इथल्या काही बांधवांचे फोन आम्हाला आले आणि त्यांनी असे सांगितले की, मारकडवाडीतून एकच बाजू महाराष्ट्रासमोर जात आहे. मारकडवाडीतील लोकांना बॅलेट पेपरवर मतदान हवा आहे, असे त्यातून सांगितले जातेय. मात्र खरेच इथल्या लोकांना बॅलेट पेपरवर मतदान हवे आहे का? माविआला कोणी मतदान केलेय का? हे सर्वांना कळले पाहिजे, म्हणून आम्ही मारकडवाडीत आलो आहे. मात्र हे मारकडवाडी पार्टन सर्वप्रथम कुणाल दिसले. हे गाव माझ्या पै-पाहुण्यांचे गाव आहे. ९० टक्के येथे धनगर समाज राहतो. म्हणून माझी जबाबदारी वाढली आणि लक्षात आले की इथे धनगरांनाच पुढे का करण्यात आले? म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या प्रक्रियेतून जी निवडणूक पार पडते त्याच्या विरोधात आहे, असे वातावरण निर्माण करण्याचे महापाप शरद पवार यांनी केला आहे. म्हणुन आज आम्ही मारकडवाडी मध्ये आलो आहे.

नरेंद्र मोदींचे खरे चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत राहुल गांधींचे खोटे गावभर फिरून येते. तसेच देवभाऊचे खरे बाहेर पडेपर्यंत शरद पवार यांचे खोटे गावभर फिरून येते. मारकडवाडीत पवार आले तेव्हापासून शरद पवारांची अक्कल आता संपली आहे. शरद पवारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका कश्या होतात. त्याबाबत आमदारांचे प्रशिक्षण घ्यावे आणि मैदानात यावे. ईव्हीएममध्ये घोळ कसा झाला ते सांगावे, असे पडळकरांनी म्हटलेय.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या