Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून 'नाताळ'साठी गाईडलाईन जाहीर

करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ‘नाताळ’साठी गाईडलाईन जाहीर

मुंबई l Mumbai

राज्यातील करोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे यंदा करोनाचा कहर सुरू असताना या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षातील सर्वच सण साधेपणाने साजरा केले जात आहे.

- Advertisement -

सरकारने मंगळवारपासून नाईट कर्फ्यू लागू केला. २२ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यातच आता ख्रिसमसतसेच न्यू ईयर जवळ येत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिश्चन धर्मियांच्या नाताळ सणासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.

करोनामुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी नाताळ उत्सव साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

जाणून घ्या नियम

चर्चमध्ये ख्रिसमसदरम्यान गर्दी न होण्याची काळजी घेतली जावी.

चर्चमध्ये जी सामूहिक प्रार्थना केली जाते. त्यात५०हून अधिक माणसांचा समावेश नसला पाहिजे.

या मासदरम्यान प्रत्येकाने सुरक्षित अंतर म्हणजेच सोशल डिन्स्टन्सिंगचे नियम पाळले पाहिजे तसेच चर्चमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे अत्यंत आवश्यक आहे.

चर्च तसेच परिसराचे सॅनिटायझेशन केले गेले पाहिजे

चर्चमधील एका कॉयरमध्ये (गायन स्थळ) १० पेक्षा अधिक लोकांचा समावेश असता कामा नये. तसेच यावेळी वापरले जाणारे माईकही सॅनिटाईज केलेले असावेत.

मोठ्या प्रमाणात आतिषबाजी नको. तसेच गर्दी होणारे देखावे करू नयेत.

ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ६०हून अधिक आहे तसेच लहान मुले ज्यांचे वय १० वर्षाहून कमी आहे अशांनी चर्चमध्ये जाणे टाळावे. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे हा सण घरीच साजरा करा.

तसेच ३१ डिसेंबर चर्चमध्ये जो थँक्स गिव्हिंग कार्यक्रम साजरा केला जातो तो संध्याकाळी सातच्या सुमारास अथवा त्याआधी करावा. मध्यरात्री हा कार्यक्रम करू नये.

- Advertisment -

ताज्या बातम्या