Thursday, June 18, 2026
HomeनगरAhilyanagar : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच होणार

Ahilyanagar : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आ. जगताप यांना आश्वासन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच व्हावे या मागणीसाठी गुरूवारी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान भवनात भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून आ. जगताप यांना आश्वासन दिले.
यावेळी दिलेल्या निवेदनात आ. जगताप यांनी नमूद केले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे.

- Advertisement -

हे महाविद्यालय शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होणे गरजेचे आहे. जेणेकरून शहरासह जिह्यातील सर्व नागरीकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सोयीचे होईल. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या नालेगाव परिसरातील कृषी विभागाची 25 एकर जमीन उपलब्ध आहे. सध्या ही जागा वापरात नसून त्या जागी जर सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यास सर्व नागरिकांची चांगली सोय होईल.

अहिल्यानगर जिल्ह्यासह सोलापूर, पुणे व मनमाड जिल्हांना जोडणारा हा मध्यवर्ती भाग आहे. तरी अहिल्यानगर जिल्ह्यात मंजुर झालेले शासकीय वैद्यकीय महाविदयालय कृषी विभागाच्या नालेगाव येथील 25 एकर जागेमध्ये होणेबाबत योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी आ. जगताप यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

५९ वर्षीय भोंदू बाबाकडून तरुणीवर अत्याचार; दोन नराधमांसह सहा महिलांना अटक

0
पुणे | प्रतिनिधी आपण प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार असल्याचा बनाव रचून एका ५९ वर्षीय भोंदू बाबाने २६ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात...