Friday, November 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमालमत्ता व्यवहारात पारदर्शकतेसाठी सरकारचा मोठा निर्णय; दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती आयकर...

मालमत्ता व्यवहारात पारदर्शकतेसाठी सरकारचा मोठा निर्णय; दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती आयकर खात्याला देणार

दस्त नोंदणीच्या वेळी रोख आणि धनादेशाच्या रकमेची स्वतंत्र नोंद होणार

- Advertisement -

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

मालमत्ता दस्त नोंदणी करताना दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने दिलेल्या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला कळविण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यात येणार आहे. दस्त नोंदणीच्या वेळीच रोख आणि धनादेशाद्वारे दिलेल्या रकमेची स्वतंत्र नोंद करण्याची सुविधा नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या ‘आय-सरिता’ प्रणालीमध्ये करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रकांना यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारात दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने दिली किंवा स्वीकारली गेल्यास त्याची माहिती आयकर विभागाला देणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने १६ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने तसेच आयकर कायद्यातील तरतुदींनुसार महसूल विभागाने याबाबत निर्देश दिले होते.

या निर्देशांनुसार नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना रोख व्यवहारांची माहिती आयकर विभागाला पाठविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दोन लाखापेक्षा अधिक रोख व्यवहार झालेल्या दस्तांची माहिती दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत आयकर विभागाला पाठविणे आवश्यक आहे.

ही प्रक्रिया अधिक सोपी आणि अचूक करण्यासाठी आता ‘आय-सरिता’ प्रणालीत बदल करण्यात येणार आहेत. दस्त नोंदणी करतानाच खरेदीदाराने विक्रेत्याला किती रक्कम रोखीने दिली आणि किती रक्कम धनादेशाद्वारे दिली, याची स्वतंत्र नोंद होईल. त्यामुळे व्यवहाराचा संपूर्ण तपशील नोंदणीच्या वेळीच उपलब्ध होईल.

मालमत्ता व्यवहारात पारदर्शकता
दस्त नोंदणीच्या वेळी रोख आणि धनादेशाच्या रकमेची स्वतंत्र नोंद होणार
एकापेक्षा जास्त खरेदीदार-विक्रेते असल्यास प्रत्येकाचा स्वतंत्र हिशोब संकलित करणार
दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफ फाइनांशियल ट्रांजेक्शन्स आयकर विभागाकडे जाणार
आय-सरिता’ प्रणालीत स्वतंत्र नोंदीची सुविधा, खरेदीदार आणि विक्रेत्याच्या व्यवहारांचा स्वतंत्र हिशेब

ताज्या बातम्या

Cricket : रायझिंग स्टार्स आशिया चषक : भारताचा नेपाळवर ३०६ धावांनी...

0
दोहा रायझिंग स्टार्स आशिया चषक स्पर्धेत भारत ‘अ’ संघाने नेपाळविरुद्ध ऐतिहासिक विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करत भारताने ५० षटकांत ९ विकेट गमावत ३३२ धावांचा...