मुंबई | वृत्तसंस्था Mumbai
येत्या २१ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार एसटी महामंडळाने सुमारे एक हजार जादा बसेस सज्ज ठेवल्या आहेत. या माध्यमातून भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही वारकरी संप्रदायात विशेष महत्व आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही संबोधले जाते. त्यामुळे या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. चंद्रभागेच्या पवित्र तीरावर भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनुपम सोहळा अनुभवायला मिळतो.
भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानकातून राज्यातील विविध भागांसाठी जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. दर्शनानंतर भाविकांना आपल्या गावी परतण्यासाठीही पुरेशा बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गर्दीचे नियोजन, बसफेऱ्यांचे व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महामंडळाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा, तर ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तिकिटाच्या दरात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलतींचा लाभ घेत भाविकांनी खासगी वाहनांऐवजी एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवाससेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
‘भक्तीचा प्रवास असो वा परतीची वाट, वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटीची लालपरी सदैव सज्ज आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी व्हावा, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे,’ असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
🗓️ २० नोव्हेंबर २०२६ | 📍 मुंबई
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) जय्यत तयारी केली आहे. येत्या २१ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या सुचनेनुसार एसटी महामंडळाने सुमारे एक हजार जादा बसेस सज्ज ठेवल्या आहेत. या माध्यमातून भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानकातून राज्यातील विविध भागांसाठी जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. दर्शनानंतर भाविकांना आपल्या गावी परतण्यासाठीही पुरेशा बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून अमृत ज्येष्ठ नागरिक, ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ घेत भाविकांनी खासगी वाहनांऐवजी एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवाससेवेला प्राधान्य द्यावे.
भक्तीचा प्रवास असो वा परतीची वाट, वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटीची लालपरी सदैव सज्ज आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी व्हावा, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे.
@msrtcofficial
#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #KartikiEkadashi #PandharpurWari— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) November 20, 2026




