Friday, May 3, 2024
Homeनाशिक५ वीचा वर्ग प्राथमिकला जोडणार

५ वीचा वर्ग प्राथमिकला जोडणार

येवला | प्रतिनिधी

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील तरतुदी नुसार आता माध्यमिक विभागाकडील इयत्ता ५ वी चे वर्ग त्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था वा इतर प्राथमिक शाळेला जोडले जाणार असून ही कार्यवाही टप्प्याटप्प्याने होणार असल्याचे आज झालेल्या शासन आदेशात म्हंटले आहे.

- Advertisement -

दि. १३ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसार, शाळाांची प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशी सांरचना/ स्तर निश्चित करण्यात आले आहेत. तसेच अधिनियमातील तरतुदी इ. १ ली ते इ. ५ वी, इ. ६ वी ते इ. ८ वी इ. ९ वी ते १० वी असे गट करण्यात आलेले आहेत.

यामुळे इ. ५ वी च्या मुलाांना कमी अंतर प्रवास करावा लागेल व घराच्या जास्त जवळ शाळा उपलब्ध होईल. तसेच, मुलाांना पूर्ण प्राथमिक शिक्षण एकाच शाळेत पूर्ण करणे शक्य होईल.

केंद्र शासनामार्फत चालविण्यात येणा-या माध्यमिक शाळाांमध्ये सुद्धा इ. ६ वी ते इ. १२ वी वर्गाची व्यवस्था आहे.

बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील तरतूदीनुसार माध्यमिक शाळाांतील इ. ५ वी चा वर्ग प्राथमिक शाळाांना जोडणे व या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकाांचे समायोजन करण्यात येणार आहे.

स्थानिक परिस्थिती प्रमाणे नियोजन करुन, राज्यातील ज्या शासकीय किंवा खाजगी अनुदामनत/ अंशत: अनुदानित माध्यमिक (५ वी ते १० वी, इत्यादी) शाळेत इ. ५ वी चा वर्ग आहे, तो तेथून वर्ग करुन इ. १ ली ते इ. ४ थी वर्ग असणा-या स्थानिक/ नागरी स्वराज्यसांस्थाांच्या प्राथमिक शाळाांमध्ये किंवा खाजगी अनुदानित/ अांशत: अनुदानीत प्राथमिक शाळाांमध्ये टप्प्या-टप्प्यात जोडण्यात येणार आहे.

याची कार्यवाही व त्याचे नियोजन व अांमलबजावणी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद याांच्या सनियांत्रणाखाली करण्यात येणार आहे. हे करताना कोणत्याही शिक्षकाच्या वेतनावर शासनाचा आर्थथक बोजा वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, असे शासन आदेशात म्हंटले आहे. ज्या माध्यमिक शाळाांमध्ये इ. ५ वी चे वर्ग आहेत त्या शाळाांमधील इ. ५ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांचे समायोजन त्याांच्या इच्छेप्रमाणे व त्याांच्या घराजवळच्या खाजगी अनुदानित/ स्थानिक/ नागरी स्वराज्य सांस्थेच्या प्राथमिक शाळामध्ये करण्यात यावे.

ज्या खाजगी अनुदानीत सांस्थेच्या माध्यमिक शाळेतील इ. ५ वी चा वर्ग प्राथमिक शाळेला जोडावयाचा आहे, व त्याच सांस्थेची/ व्यवस्थापनाची इ. १ ली ते इ. ४ थी वर्ग असणारी अनुदामनत किंवा त्याच टप्प्यावर अांशत: अनुदानित प्राथमिक शाळा त्या परिसरामध्ये उपलब्ध असल्यास सदर प्राथमीक शाळेस सदर इ. ५ वी चा वर्ग (शक्यतो विद्यार्थ्यांसह) जोडण्यात यावा.

पहील्या टप्प्यात प्राथमिक शाळाांमध्येइ. ५ वी चा वर्ग जोडताना ज्या प्राथमिक शाळाांमध्ये भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात यावे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जेथे नव्याने इ. ५ वी चा वर्ग सुरु करावयाचा आहे, तेथे आवश्यक वर्ग खोली उपलब्ध नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेने अन्य तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी, किंवा नवीन वर्ग खोल्याांचे बाांधकाम करावे.

खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील इ. ५ वी च्या वर्गावरील कार्यरत शिक्षकांचे समायोजन प्रथम प्राधान्याने त्याच संस्थेअंतर्गत सुरु असलेल्या इतर अनुदानित शाळेत करण्यात यावे. कार्यरत शिक्षक ज्या सांस्थेमध्ये कार्यरत आहे, त्या संस्थेमध्ये समायोजन करणे शक्य नसल्यास दुसरा प्राधान्यक्रम म्हणून सदर शिक्षकाांचे अन्य खाजगी अनुदानीत संस्थेमध्ये समायोजन करण्यात यावे.

अशाप्रकारे इतर खाजगी अनुदामलनीत सांस्थेमध्ये सुद्धा समायोजन न होऊ शकलेल्या शिक्षकाांचे समायोजन तृतीय प्राधान्यक्रम म्हणून स्थानीक/ नागरी स्वराज्य सांस्थाांच्या शाळाांमध्ये करण्यात यावे. मात्र अांशत: अनुदानीत शाळेतून पूर्णत: अनुदानीत किंवा वाढीव टप्प्यावर अनुदानीत किंवा नागरी / स्थानीक स्वराज्य सांस्थेच्या शाळेत समायोजन करु नये, जेणे करुन शासनावर आर्थिक बोजा वाढणार नाही.

या शिक्षकाांचे समायोजन शासन निर्णय ४ ऑक्टोबर २०१७ मधील तरतूदीनुसार टप्प्या-टप्प्यात जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर करण्यात यावे. हे समायोजन करण्याची जबाबदारी जिल्हा स्तरावर संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, विभागीय स्तरावर संबंधित विभागीय शिक्षण उपसांचालक व राज्य स्तरावर शिक्षण सांचालक (माध्यमीक व उच्च माध्यमीक), महाराष्ट्र राज्य व शिक्षण सांचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य याांची राहील.

समायोजन करताना शासनावर कोणताही अधिक आर्थिक बोजा निर्माण होणार नाही, व कोणतेही नवीन पद निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असेही शासन आदेशात म्हंटले आहे.

खाजगी अनुदानीत माध्यमिक शाळाांनी यापुढे इ. ५ वी मध्ये नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत. अशा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परिसरातील प्राथमिक शाळाांमध्ये प्रवेश घेण्यास सूचित करावे, असेही शासन आदेशात म्हंटले आहे.

यामुळे सध्या खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेत ५ वी च्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या