Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशपीपीएफमध्ये गुंतवणूक करता?; सरकारने नियम बदलला, जाणून घ्या

पीपीएफमध्ये गुंतवणूक करता?; सरकारने नियम बदलला, जाणून घ्या

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

पीपीएफ (PPF) खात्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारने एक नवीन नियम (New rules) जारी केला आहे. या नव्या नियमामुळे गुंतवणूकदारांवर (Investors) थेट परिणाम होणार आहे…

- Advertisement -

नियम असा आहे की, दि. १२ डिसेंबर २०१९ रोजी किंवा त्यानंतर एकाच व्यक्तीने उघडलेली दोन किंवा अधिक पीपीएफ खाती विलिन करता येणार आहे, असे अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) स्पष्ट केले आहे.

याबाबत ऑफिस मेमोरेंडमदेखील (Office Memorandum) जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पीपीएफ खाती (PPF accounts) चालवणाऱ्या संस्थांनी १२ डिसेंबर त्यानंतर उघडलेल्या पीपीएफ खात्यांच्या विलिनीकरणासाठी विनंती पाठवू नये.

यात पीपीएफ २०१९ च्या नियमांचा हवाला देण्यात आला आहे. डिसेंबर २०१९ नंतर उघडलेल्या दोन किंवा अधिक पीएफ खात्यांपैकी केवळ एकच खाते आता सक्रीय राहील. उर्वरित खाती बंद केले जातील.

- Advertisment -

ताज्या बातम्या