Friday, April 25, 2025
HomeजळगावAccident धान्याचा ट्रक अमरावती एक्स्प्रेसवर आदळला : रेल्वेची वाहतूक ठप्प

Accident धान्याचा ट्रक अमरावती एक्स्प्रेसवर आदळला : रेल्वेची वाहतूक ठप्प

बोदवड /प्रतिनिधी:

नाडगाव, ता. बोदवड रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या गेटमधून धान्याचा ट्रक नियंत्रण सुटल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर आल्यानंतर याचवेळी डाऊन अमरावती एक्स्प्रेस जात असताना धडक बसल्याने ट्रकचे तुकडे-तुकडे झाले. रेल्वे चालकाने तातडीचे ब्रेक लावताच जागेवरच रेल्वे थांबली मात्र भीषण अपघातामुळे रेल्वे इंजिनाचे मोठे नुकसान होवून रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी पहाटे साडेचार वाजता घडली. घडल्या प्रकारानंतर रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.

- Advertisement -

पहाटेच्या सुमारास अपघात;

डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते अमरावती डाऊन एक्सप्रेस (12111) ही गाडी शुक्रवारी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान बोदवड रेल्वे गेट जवळून जात असताना बंद असलेले रेल्वेगेट तोडून धान्याचा ट्रक रेल्वे ट्रॅकवर येवून रेल्वे इंजिनावर आदळला. सुदैवाने रेल्वे स्थानकातून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असल्याने फारसा वेग नसलातरी रेल्वे इंजिनाच्या धडकेने ट्रकच्या दर्शनी भागाचे तुकडे झाले.

ट्रक इंजिनवर धडकताच ट्रक चालक उडी घेत पसार झाला एक्सप्रेस चालकाने तत्काळ ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. पहाटेच्या साखर झोपेत झालेल्या अपघातामुळे मात्र एक्सप्रेस मध्ये झोपलेले प्रवासी बर्थवरुन खाली पडले व जो तो नेमके काय झाले हे विचारु लागला .दरम्यान रेल्वे अपघातामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे तर भुसावळ विभागातील विविध सेक्शनमध्ये गाड्यांना थांबवून ठेवण्यात आले आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...