Friday, October 4, 2024
Homeमुख्य बातम्यालाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

निफाड | प्रतिनिधी Niphad

तालुक्यातील नैताळे (Naitale )येथील मतोबा यात्रोत्सव (Matoba yatrostav )समारोपाच्या पूर्वसंध्येलाच ग्रामसेवकास लाच ( Bribe)घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे दुकान लावून देण्याच्या बदल्यात पैसे मागितल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे यात्रोत्सवाला खुद्द शासकीय अधिकारीच कशाप्रकारे गालबोट लावत असल्याने स्थानिक पुढार्यांसमोर मान खाली घालण्याची नामुष्की ओढवली आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, दाखल तक्रारीवरून संशयित आरोपी राजेंद्र मुरलीधर दहिफळे (वय 46 वर्षे, व्यवसाय नोकरी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, नैताळे, ता. निफाड, जि. नाशिक), खासगी व्यक्ती जगन्नाथ मगन पाठक (वय 38, व्यवसाय पेंटिंग, रा.मु.पो.नैताळे, ता. निफाड, जि.नाशिक) व सागर भारत आहेर (वय 25, धंदा मजुरी, रा. वाघ शाळेजवळ, नैताळे, ता. निफाड, जि. नाशिक) यांनी गुरुवारी (दि. १९) ३१ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती शुक्रवारी (दि.२०) ७ हजार रुपयांची लाच घेताना तिघांना अटक करण्यात आली.

दरम्यान, सदर कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना भोये, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे, पोलीस नाईक हेंबाडे, पोलीस शिपाई नेटारे व गांगुर्डे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या