अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सन 2026 -27 या आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच मानधन आणि सदस्य बैठक भत्ता, भविष्य निर्वाह निधी इत्यादींच्या खर्चासाठी दोनशे तीस कोटी अठ्ठऐंशी लाख रूपये इतका निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी तसेच ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच यांच्या मानधन, सदस्य बैठक भत्ता इत्यादी अदा करण्यासाठी वित्त विभागाने अर्थसंकल्पीय तरतूद आठशे वीस कोटी छप्पन लाख रूपये मंजूर केली आहे.
त्यानुसार एप्रिल ते जून, 2026 या तीन महिन्यांचा उक्त खर्च भागविण्यासाठी 234.42 कोटी रूपये इतका निधी संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, पंचायत राज, पुणे यांना वितरीत करण्यात आला आहे. आता वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी रु.230.88 कोटी इतका निधी माहे जुलै ते सप्टेंबर, 2026 या तीन महिन्यांचा खर्च भागविण्यासाठी विभागास उपलब्ध करुन दिला आहे. कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम 230,88,00,000 रूपये (रुपये दोनशे तीस कोटी अठ्ठयाऐंशी लाख फक्त) इतका निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.




